advertisement

उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? शाळेची पहिली घंटा कधी वाजणार, शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

Last Updated:

परीक्षांचा डोंगर पार पडल्यानंतर आता वेध लागलेत ते आंबा, सुट्टी आणि मामाच्या गावाचे! शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं

शाळांना सुट्टी कधी? - प्रातिनिधिक फोटो
शाळांना सुट्टी कधी? - प्रातिनिधिक फोटो
आता ओढ लागली आहे ती म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची, मामाच्या गावाला जाऊन छान मज्जा करायची किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आई बाबांसोबत बाहेर फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांची काहीशी निराशा होण्याची शक्यता आहे. दरवेळी 10 ते 15 एप्रिलनंतर जी उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची तसं न होता उन्हाळ्याची सुट्टी ही 2 मे पासून सुरू होणार आहे.
१ मे नंतर लागणार सुट्ट्या
1 मे रोजी निकाल लागल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी सुरू होईल. त्यानंतर जून महिन्यात पुन्हा शाळा सुरू होईल. उन्हाळ्याची सुट्टी या वेळी कमी मिळणार आहे. परीक्षांचा डोंगर पार पडल्यानंतर आता वेध लागलेत ते आंबा, सुट्टी आणि मामाच्या गावाचे! शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं असून, राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. पण यंदाच्या सुट्ट्यांमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे, जो विदर्भातील शाळा आणि पालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना यंदा २ मेपासून अधिकृत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२६-२७ या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे.
शाळा कधी सुरू होणार?
आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर, विदर्भातील कडक उन्हाळा लक्षात घेता तिथल्या शाळा इतर महाराष्ट्राच्या तुलनेत आठवडाभर उशिरा सुरू व्हायच्या. मात्र, यंदा शिक्षण संचालनालयाने सुट्ट्यांच्या कालावधीत एकरूपता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई-पुण्यासोबतच नागपूर-गडचिरोलीतील शाळाही १५ जूनलाच सुरू होणार आहेत. जर एखाद्या शाळेला स्थानिक सणांसाठी अधिक सुट्ट्या हव्या असतील, तर त्यांना उन्हाळी सुट्टीत कपात करावी लागेल.
advertisement
७६ दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या नको
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, शाळांना उन्हाळी सुट्टी जरी २ मेपासून असली, तरी शिक्षकांना निकालाची कामे आणि पुढील वर्षाचे नियोजन पूर्ण करावे लागणार आहे. ज्या शाळांना उन्हाळ्याऐवजी इतर सणांना जास्त सुट्ट्या हव्या असतील, त्यांनी शिक्षण अधिकार्‍यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त असणार नाहीत, याची काळजी शाळांना घ्यावी लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? शाळेची पहिली घंटा कधी वाजणार, शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement