advertisement

केसरकरांकडून अशोक खरातची भलामण, शिवसेना आमदारांची तक्रार, एकनाथ शिंदे चांगलेच संतापले

Last Updated:

एकनाथ शिंदे हे केसरकर यांच्यावर चांगलेच संतापले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

एकनाथ शिंदे-दीपक केसरकर
एकनाथ शिंदे-दीपक केसरकर
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई : नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकर याच्यानंतर भोंदू खरातबरोबर दीपक केसरकर यांची चांगलीच उठबस असल्याचे आरोप होत आहे. केसरकर अनेकदा खरात याने उभारलेल्या मंदिरात पूजेसाठी जायचे. किंबहुना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनाही त्यांनीच खरात याच्याकडे नेले, असेही आरोप होत आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना आपल्याला टार्गेट केले जात असल्याचे केसरकर म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण गेलो होतो, असे म्हणत त्यांनी शिंदेंवर हे प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न केला. यामुळेच एकनाथ शिंदे हे केसरकर यांच्यावर चांगलेच संतापले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दिपक केसरकर अप्रत्यक्षपणे भोंदू अशोक खरातची भलामण करत असल्याचे अनेक मंत्री आणि आमदारांचे म्हणणे आहे. दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर पक्षातील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

केसरकरांचा अशोक खरात याच्याबद्दल सहानुभूतीचा सूर, शिवसेना आमदारांची तक्रार 

advertisement
दीपक केसरकर यांना पक्षातील वरिष्ठांकडून समज देण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. केसरकर घेत असलेल्या पत्रकार परिषदेतून अशोक खरात याच्याबद्दल सहानुभूतीचा सूर जात असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.

केसरकरांनी चुकीच्या व्यक्तीची भेट घडवून आणली

२०२२ साली राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरच्या मिरगावात जाऊन पूजाविधी केल्यानंतर अशोख खरात याचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. दीपक केसरकर यांनीच एकनाथ शिंदे यांना खरात याची भेट घडवून आणल्याचे आरोप होत आहेत. केसरकरांनी चुकीच्या व्यक्तीची भेट घडवून आणली, असे आमदारांचे म्हणणे आहे. केसरकरांचे खरात याच्याशी असलेल्या कनेक्शनमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे म्हणत खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मत शिवसेनेतील आमदारांनी व्यक्त केले.
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातकडे पूजा केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते अशोक खरात याच्याकडे जाऊ लागले. प्रशासनातील बडे अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील कलाकार आदी मान्यवरांचा खरातकडे राबता वाढला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
केसरकरांकडून अशोक खरातची भलामण, शिवसेना आमदारांची तक्रार, एकनाथ शिंदे चांगलेच संतापले
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement