advertisement

IPL 2026 : वडिलांनी मजुरी करून क्रिकेटर बनवलं, पोराने पहिल्याच सामन्यात CSK ला लोळवलं!

Last Updated:

आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही युवा भारतीय खेळाडू त्यांची छाप सोडतात, यातले बहुतेक खेळाडू हे लहान शहरांमधून आलेले असतात आणि कठीण परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचतात.

वडिलांनी मजुरी करून क्रिकेटर बनवलं, पोराने पहिल्याच सामन्यात CSK ला लोळवलं!
वडिलांनी मजुरी करून क्रिकेटर बनवलं, पोराने पहिल्याच सामन्यात CSK ला लोळवलं!
मुंबई : आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही युवा भारतीय खेळाडू त्यांची छाप सोडतात, यातले बहुतेक खेळाडू हे लहान शहरांमधून आलेले असतात आणि कठीण परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचतात. आयपीएल 2026 च्या तिसऱ्या सामन्यातही अशाच एका युवा प्रतिभावान खेळाडूने अडचणींवर मात करून स्वतःला सिद्ध केलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या ब्रिजेश शर्माने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
27 वर्षांच्या ब्रिजेश शर्माला राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या लिलावात 30 लाख रुपयांच्या किंमतीवर विकत घेतलं होतं. आयपीएलमध्ये ब्रिजेशला पहिल्यांदाच एखाद्या टीमने विकत घेतलं तसंच त्याला पहिल्याच सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. ब्रिजेशने आपल्या पहिल्याच सामन्यात 3 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देऊन एक विकेटही घेतली. सीएसकेने लिलावात 14.20 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलेल्या कार्तिक शर्माला ब्रिजेशने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
advertisement

ब्रिजेशचा खडतर प्रवास

ब्रिजेशचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, घरातल्या गरीब परिस्थितीवर मात करून ब्रिजेश इथपर्यंत पोहोचला आहे. क्रिकेटसाठी त्याला आपलं गाव आणि राज्यही सोडावं लागलं. ब्रिजेश जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरचा रहिवासी आहे. वडील मजूर असूनही त्यांनी ब्रिजेशला क्रिकेटपटू करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. फक्त वडिलच नाही तर मित्रांनीही ब्रिजेशला खूप पाठिंबा दिला आणि गरजेच्या वेळी आर्थिक मदत केली.
advertisement
उधमपूरमध्ये ब्रिजेशची कारकीर्द बहरत नव्हती म्हणून तो बंगालला गेला आणि त्याला बंगालच्या टी-20 लीगमध्ये स्थान मिळाले. तिथे त्याने 7 सामन्यांमध्ये 11 विकेट घेऊन टीममधलं आपलं स्थान निश्चित केलं. बंगाल टी-20 लीगमधूनच ब्रिजेशला राजस्थान रॉयल्सच्या स्काऊट टीमने पाहिलं आणि त्याला राजस्थान रॉयल्समध्ये आणलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : वडिलांनी मजुरी करून क्रिकेटर बनवलं, पोराने पहिल्याच सामन्यात CSK ला लोळवलं!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement