advertisement

मृतदेहाची ओळख पुसण्यासाठी 'ती' भयानक शक्कल, पण CCTV मुळं प्लॅन फसला, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Last Updated:

Nalasopara Shocking case : नालासोपाऱ्यामध्ये आर्थिक वादातून मित्राची निर्घृण हत्या करून त्याचे शीर वेगळे करण्यात आले.मात्र पोलिसांनी अवघ्या 8 तासांत कशा प्रकारे प्रकरणाची उकल करून दोन आरोपींना अटक केली आहे.

नालासोपाऱ्यातील शिरच्छेद प्रकरणाचा ९ तासांत उलगडा
नालासोपाऱ्यातील शिरच्छेद प्रकरणाचा ९ तासांत उलगडा
नालासोपारा : नालासोपारा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं पेल्हार येथील किराणा दुकानाच्या व्यवयातील झालेल्या आर्थिक वादातून त्याच्या साथीदाराची हत्या झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून शीर वेगळे केले होते. तो मृतदेह पेल्हारमधील एक आंब्याच्या वाडीत फेकून दिला होता तर डोके हे तानसा नदीत टाकण्यात आले होते.
मृतदेहाची ओळख ही अशोक सिंग राजपूत अशी पटली असून तो आरोपींचा मित्र होता. या घडलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत छडा लावून दोन आरोपींनी अटक केली असून 10 एप्रिलपर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. दिनेशकुमार प्रजापती(वय27) आणि त्याचा साथीदार संदीप तिवारी (वय35) असे आरोपींची नावे आहेत.
नेमके घडले काय होते?
मिळालेल्या माहितीनुसार 30 मार्च रोजीच्या सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका आंब्याच्या वाडीत हा शीर नसलेला मृतदेह आढळून आलेला होता. त्यानंतर या घटनेप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अज्ञान व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास अन्
पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. त्यात पोलिसांनी परिसरातील तब्बल 200 ते 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी घेतली आणि एका वाहनावर संशय आला.यात पोलिसांनी तपास करत दिनेशकुमार प्रजापती याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिशेकुमारची चौकशी सुरु केली असता त्यात त्याने किराणा व्यवसायातील आर्थिक वादातून त्याचा खून केल्याची कबुली दिली आणि ओखळ पटू नये म्हणून शीर वेगळे केले. आरोपींनी दिलेल्या कबूलीनुसार पोलिसांनी तात्काळ शीर शोधण्यासाठी नदीकिनारी शोध सुरु केला.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
मृतदेहाची ओळख पुसण्यासाठी 'ती' भयानक शक्कल, पण CCTV मुळं प्लॅन फसला, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement