advertisement

LPG Price Hike: महागाईचा भडका उडाला, व्यावसायिक एलपीजी पाठोपाठ ५ किलोचा सिलिंडरही झाला महाग, किती रुपयांनी झाली दरवाढ?

Last Updated:

LPG Price Hike: १ एप्रिल २०२६ पासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. व्यावसायिक (Commercial) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून, ५ किलोच्या एफटीएल (FTL) सिलिंडरचे दरही वाढले आहेत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली: १ एप्रिल २०२६ पासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. व्यावसायिक (Commercial) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून, ५ किलोच्या एफटीएल (FTL) सिलिंडरचे दरही ५१ रुपयांनी वधारले आहेत. विशेष म्हणजे, या वर्षातील ही पाचवी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा हा थेट परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
५ किलोचे फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडर, हा सामान्यतः 'छोटू' म्हणून ओळखला जातो. इण्डेन, भारत गॅस आदी गॅस कंपन्यांकडून याचे वितरण केले जाते. एलपीजीचा कमी वापर किंवा जास्त प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी हा सिलिंडर फायदेशीर आहे. यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा नसताना एकटे राहणारे नोकरदार, मजूर यांचा समावेश होतो. हे कॉम्पॅक्ट सिलिंडर लहान व्यावसायिक (हॉटेल-खाद्यपदार्थ स्टॉल्स), कॅम्पर्स आणि घरगुती बॅकअपसाठी देखील वापरले जातात. त्यामुळे या गॅसच्या दरवाढीची झळ सामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
advertisement

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९५ रुपयांची वाढ

आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता २०७८.५० रुपये झाली आहे. यापूर्वी तो १,८८४.५० रुपयांना उपलब्ध होता. कोलकातामध्ये १९-किलोग्राम सिलेंडरची किंमत २२०८ रुपये, मुंबईत २०३१ रुपये आणि चेन्नईत २२४६.५० रुपये झाली आहे. पाटणामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ₹2365 आणि जयपूरमध्ये ₹2031 पर्यंत वाढली आहे.
advertisement

घरगुती ग्राहकांना तूर्तास दिलासा

व्यावसायिक गॅस महागला असला तरी, घरगुती वापराच्या (१४.२ किलो) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती सिलिंडरचे दर अद्याप ९१३ रुपये इतकेच आहेत. ७ मार्च रोजी घरगुती गॅसमध्ये ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
view comments
मराठी बातम्या/मनी/
LPG Price Hike: महागाईचा भडका उडाला, व्यावसायिक एलपीजी पाठोपाठ ५ किलोचा सिलिंडरही झाला महाग, किती रुपयांनी झाली दरवाढ?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement