advertisement

LPG Gas Price Hike: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 195 रुपयांची वाढ, घरगुतीसाठी किती मोजावे लागणार पैसे?

Last Updated:

व्यावसायिकांना गॅस सिलिंडर मिळणं कठीण होत असताना पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

गॅस सिलिंडर
गॅस सिलिंडर
आखाती युद्धाच्या झळा आता आणखी तीव्र व्हायला लागल्या आहेत. आधीच LPG सिलिंडर मिळत नसल्याने सर्वसामान्य लोकांपासून ते छोट्या मोठ्या उद्योगांपर्यंत मोठा फटका बसला आहे. त्यात व्यावसायिकांना गॅस सिलिंडर मिळणं कठीण होत असताना पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.
किती रुपयांनी वाढला गॅस सिलिंडर
एक एप्रिलची सकाळ व्यावसायिक आणि हॉटेल चालकांसाठी मोठा दणका देणारी बातमी ठरली आहे. आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात तब्बल १९५.५० रुपयांची वाढ केली. आधीच महागाई वाढली असताना आता या झळा आणखी तीव्र बसण्याची शक्यता आहे.
सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. १९-किलोग्रामच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात २१८ रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्लीत सिलेंडरची किंमत १९४ रुपये, चेन्नईत २०३ रुपये, मुंबईत १९६ रुपये आणि कोलकातामध्ये २१८ रुपये असेल. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
advertisement
या दरवाढीनंतर, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता २०७८.५० रुपये झाली आहे. यापूर्वी तो १,८८४.५० रुपयांना उपलब्ध होता. कोलकातामध्ये १९-किलोग्राम सिलेंडरची किंमत २२०८ रुपये, मुंबईत २०३१ रुपये आणि चेन्नईत २२४६.५० रुपये झाली आहे. पाटणामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ₹2365 आणि जयपूरमध्ये ₹2031 पर्यंत वाढली आहे.
advertisement
आणखी महागाई वाढणार
महिन्याभराच्या अंतरात झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. यापूर्वी १ मार्च रोजी कमर्शियल सिलिंडर ११४.५ रुपयांनी वाढ केली होती. आता झालेल्या दरवाढीनंतर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. हॉटेल, केटरर्स आणि छोट्या दुकानदारांसाठी हा मोठा आर्थिक बोजा ठरणार आहे, ज्याचा परिणाम पर्यायाने बाहेरच्या जेवणाच्या दरांवर होऊ शकतो.
advertisement
गृहिणींना मोठा दिलासा
व्यावसायिक सिलिंडरचे दर आकाशाला भिडले असले तरी, गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरमध्ये ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर सध्या दिल्लीत हा सिलिंडर ९१३ रुपयांना मिळत असून तीच किंमत कायम ठेवण्यात आली आहे.
advertisement
का वाढतात किंमती
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलनाच्या दरांचा आढावा घेऊन एटीएफ आणि एलपीजीच्या किमती ठरवतात. जागतिक बाजारातील याच अस्थिरतेचा फटका आता भारताच्या मार्केटला बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
LPG Gas Price Hike: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 195 रुपयांची वाढ, घरगुतीसाठी किती मोजावे लागणार पैसे?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement