advertisement

Prajakta Mali : 'प्राजक्तराज'मुळे अडथळे! ज्वेलरी ब्रँडबाबत प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, नेमकं काय झालं?

Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या प्राजक्तराज ज्वेलरी ब्रँडचं नाव बदललं आहे. तिनं असं का केलं?
1/7
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही केवळ अभिनयापुरती मर्यादित नसून ती एक यशस्वी व्यावसायिकाही आहे. तिचा 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रँड गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाला.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही केवळ अभिनयापुरती मर्यादित नसून ती एक यशस्वी व्यावसायिकाही आहे. तिचा 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रँड गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाला.
advertisement
2/7
विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी या ब्रँडचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मात्र आता प्राजक्ताने या ब्रँडबाबत एक मोठा निर्णय घेतला असून ब्रँडचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे.

3/7
प्राजक्ताने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांना ही माहिती दिली. तिने स्पष्ट केलं की, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 31 मार्चपासून तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव बदलून 'प्राजक्तसाज – Reviving Maharashtra's Legacy' असं ठेवण्यात आलं आहे.

4/7
याबाबत बोलताना प्राजक्ता म्हणाली,
याबाबत बोलताना प्राजक्ता म्हणाली, "खरं तर आजचं लाइव्ह अतिशय स्पेशल कारणासाठी आहे. अर्थात हे माझ्या आणि आपल्या ब्रँडसंदर्भात आहे. आता नव्या आर्थिक वर्षात म्हणजे 31 मार्च पासून माझ्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे 'प्राजक्तसाज - Reviving Maharashtra's Legacy'."
advertisement
5/7
ती पुढे म्हणाली,
ती पुढे म्हणाली, "तसंच मला माहिती आहे की ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तीन-सव्वातीन वर्षांपूर्वी हा ब्रँड सुरू केला तेव्हा मला बिझनेसबद्दल फार काहीच कल्पना नव्हती. भावनेतून बऱ्याच गोष्टी होत गेल्या. बिझनेस इतका मोठा होईल याचीही कल्पना नव्हती."
advertisement
6/7
 "महाराष्ट्रासोबतच देशभरात, परदेशातही मोठा प्रतिसाद मिळतोय. पण अनेकदा शिपिंगदरम्यान खूप अडथळे यायचे. या सगळ्यातून एक मार्ग काढण्यासाठी ' प्राजक्तसाज -Reviving Maharashtra's Legacy' हे नाव जन्माला आलेलं आहे."

7/7
दरम्यान नाव बदललं असलं तरी ब्रँडची ओळख कायम असणार आहे असंही प्राजक्तानं सांगितलं. ती म्हणाली,
दरम्यान नाव बदललं असलं तरी ब्रँडची ओळख कायम असणार आहे असंही प्राजक्तानं सांगितलं. ती म्हणाली, "नावासोबत आम्हाला लोगोही बदलायचा होता, पण इतका छान, सुंदर लोगो आम्हाला सापडला नाही. त्यामुळे नाव बदललं असलं तरी लोगो तोच राहणार आहे. तसंच माझं हस्ताक्षरही तेच राहणार आहे."
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement