रात्री 8 वाजता गूगल, Apple, मायक्रोसॉफ्टमध्ये नरसंहार करू; इराणीच्या धमकीनंतर कर्मचाऱ्यांनी ऑफिस सोडले, अमेरिकेच्या काळजाचा ठोका चुकला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Iran News: इराणच्या IRGC ने मोठ्या टेक कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिल्याने पश्चिम आशियातील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. अमेरिकेकडूनही कडक भूमिका घेतली जात असून युद्ध निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.
तेहरान: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना कडक इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गूगल, इंटेल आणि बोईंग यांसारख्या कंपन्यांना लक्ष्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने केलेल्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून या कंपन्यांना वैध लक्ष्य मानले जाईल, असे IRGC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
IRGC च्या निवेदनानुसार अमेरिकेतील ICT आणि AI कंपन्या हत्या आणि गुप्त कारवायांच्या नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे इराणमध्ये होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी कारवाईच्या बदल्यात या कंपन्यांच्या संबंधित ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे. ही माहिती इराणच्या ‘प्रेस टीव्ही’ने दिली आहे.
नागरिकांना स्थलांतराचे आवाहन
या निवेदनात संबंधित कंपन्यांचे कर्मचारी आणि त्या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एक किलोमीटरच्या परिसरातील लोकांनी तात्काळ स्थलांतर करावे, असेही IRGC ने सांगितले आहे. तसेच प्रत्युत्तरात्मक कारवाया 1 एप्रिल रोजी तेहरान वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून सुरू होतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. मात्र यापूर्वीही IRGC ने अशाच प्रकारचे इशारे दिले होते. पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली दिसली नव्हती.
advertisement
अमेरिकेचा कडक इशारा
दरम्यान अमेरिकेचे संरक्षण सचिव Pete Hegseth आणि जॉइंट चीफ्स चेअरमन जनरल Dan Caine यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुढील काही दिवस इराणसोबतच्या युद्धासाठी निर्णायक ठरणार आहेत. हॅगसेथ यांनी स्पष्ट केले की, पश्चिम आशियातील युद्ध फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवरच संपेल.
ते पुढे म्हणाले की या संघर्षात अनिश्चितता ठेवणे हीच कळीची बाब आहे. युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू असून त्या अधिक बळकट होत आहेत. मात्र अमेरिका हा संघर्ष आपल्या आणि ट्रम्प यांच्या अटींवरच संपवण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 10:38 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
रात्री 8 वाजता गूगल, Apple, मायक्रोसॉफ्टमध्ये नरसंहार करू; इराणीच्या धमकीनंतर कर्मचाऱ्यांनी ऑफिस सोडले, अमेरिकेच्या काळजाचा ठोका चुकला









