advertisement

Raja Shivaji Teaser : "इतिहासाचा नवा अध्याय!" रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित; स्वराज्याची गाथा नव्या रूपात

Last Updated:

रितेश देशमुख दिग्दर्शित, 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा पहिला वहिला लूक रिलीज झाला असून टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय.

News18
News18
मुंबई: जियो स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा पहिला वहिला लूक रिलीज झाला आहे. काही तासांपूर्वीच 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या टीझरची पहिली झलक अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलेला आहे. 'धुरंदर: द रिव्हेंज'सोबत थिएटरमध्ये चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. थिएटरमध्ये टीझर रिलीज झाल्यानंतर आता सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. थिएटरमध्ये टीझरने प्रेक्षकांचं मन जिंकल्यानंतर आता ज्या प्रेक्षकांनी टीझर पाहिलेला नाही, अशांनाही आता टीझर पाहण्याची संधी मिळाणार आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम प्रेक्षकांना पुन्हा एकदा 'राजा शिवाजी' चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुख अभिनित आणि दिग्दर्शित चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधलेय. “ “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!!!”, दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं.. छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे. आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे. हर हर महादेव.” असं कॅप्शन देत रितेशने टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)



advertisement
स्वराज्याची शौर्यगाथा, मनाला भावणारे चित्रपटातल्या संवादाने आणि महाराजांच्या युद्धनीतीची झलक शिवभक्तांना चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून प्रेक्षक आता चित्रपटासाठी कमालीचे आतुर आहेत. काही तासांपूर्वीच, रितेशने इन्स्टावर शेअर केलेल्या टीझरवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. चित्रपटासाठी फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी मंडळीही चित्रपटासाठी आतुर आहेत. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी सह अनेक सेलिब्रिटी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
advertisement
एकाच फ्रेममध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीतल्या दिग्गज कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी 'राजा शिवाजी'च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असल्यानं प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी भाषेसोबतच हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही रिलीज होणार आहे. रितेश देशमुखचा शिवरायांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. अभिनेत्याचा हा प्रामाणिक प्रयत्न चाहत्यांच्या पसंदीस पडतोय. हा सिनेमा येत्या १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Raja Shivaji Teaser : "इतिहासाचा नवा अध्याय!" रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित; स्वराज्याची गाथा नव्या रूपात
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement