Navi Mumbai News: विमानाच्या तिकिटापेक्षा नवी मुंबई विमानतळ गाठणं महाग; प्रवाशाने नवी मुंबई विमानतळ- अंधेरीसाठी दिलं 3 हजार भाडं
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Navi Mumbai To Andheri News: विमान तिकिटापेक्षा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणे अधिक महाग असल्याची खंत एका प्रवाशाने सोशल मीडिया पोस्टवर शेअर करत व्यक्त केलेली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता आणखी एक नवीन विमानतळ मुंबईमध्ये सुरू आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या देशांतर्गतच विमानसेवा सुरू आहे. या विमानतळावरून आता दिवसेंदिवस विमानांच्या संख्या वाढत आहे. पण असं असलं तरीही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढे आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नाही. वाहतुकीचा अभाव असल्यामुळे कॅब ड्रायव्हरकडून अव्वाच्या सव्वा भाव स्विकारला जात आहे. एका प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्याकडून घेतलेल्या भाड्याबद्दल आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
नवी मुंबई विमानतळावरून अंधेरीला जाण्यासाठी एका प्रवाशाला उबर टॅक्सीसाठी 3,000 रुपये भाडं मोजावे लागले. विमान तिकिटापेक्षा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणे अधिक महाग झाल्याची त्या प्रवाशाने खंत व्यक्त केली आहे. कॅब ड्रायव्हर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर भाडे आकारत असल्यामुळे आता प्रवाशांकडून बसेस आणि मीटर टॅक्सीची मागणी करण्यात येत आहे. प्रवाशाच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
advertisement
रतन शारदा नावाच्या एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, "उबरने माझ्याकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अंधेरीसाठी 3000 रुपये इतकं भाडं आकारलं होतं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सध्याची परिस्थिती बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळासारखी होऊ शकते की काय, अशी चिंता वाटतेय. जिथे प्रवाशांना प्रवासासाठी सर्वाधिक वेळ लागतो आणि वाहतुकीसाठी सुद्धा खूप पैसे लागतात. पण लागणारा सर्वाधिक वेळ आणि पैसा कदाचित एक मोठी समस्या असू शकते."
advertisement
दरम्यान, रतन शारदा या प्रवाशाने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. रतन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर अनेक युजर्सकडून पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानतळावरील कॅब ड्रायव्हरकडून होणाऱ्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे. या माध्यमातून अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिलेली आहे.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाने आपले पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. जे 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीत लागू केले जाणार आहे. या नवीन विमानतळावरून देशांतर्गत 16 विमानांची उड्डाणे होत होते. पण आता 46 विमानांचे या विमानतळावरून उड्डाणे होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून दरआठवड्याला 1092 विमानांची उड्डाणे होणार आहे.
advertisement
नवी मुंबई विमानतळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेळापत्रकात ३० नवीन देशांतर्गत मार्गांची भर पडेल, जे विमानतळाला भारतातील व्यावसायिक, पर्यटन आणि धार्मिक केंद्रांशी जोडतील. दिल्लीहून दररोज सर्वाधिक नऊ विमान फेऱ्या होणार असून, गोव्यासाठी सात आणि बंगळूरुसाठी सहा फेऱ्या असतील. याव्यतिरिक्त, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदूर या पर्यटन स्थळीही विमानांची उड्डाणे होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 10:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News: विमानाच्या तिकिटापेक्षा नवी मुंबई विमानतळ गाठणं महाग; प्रवाशाने नवी मुंबई विमानतळ- अंधेरीसाठी दिलं 3 हजार भाडं









