advertisement

IPL 2026 : 6 फुटी फिल्डर हवेत उडाला, बाऊंड्री लाईनवर चमत्कार घडला, बटलर बघतच राहिला, Video

Last Updated:

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जॉस बटलर भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरला होता, यानंतर आता आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यातही बटलर पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसला.

6 फुटी फिल्डर हवेत उडाला, बाऊंड्री लाईनवर चमत्कार घडला, बटलर बघतच राहिला, Video
6 फुटी फिल्डर हवेत उडाला, बाऊंड्री लाईनवर चमत्कार घडला, बटलर बघतच राहिला, Video
चंडीगढ : इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जॉस बटलर भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरला होता, यानंतर आता आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यातही बटलर पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसला. गुजरात टायटन्सकडून खेळणारा जॉस बटलर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि त्याने 33 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली.
पंजाब किंग्सच्या युझवेंद्र चहलने जॉस बटलरची विकेट घेतली. 16व्या ओव्हरमध्ये बटलरने चहलच्या बॉलिंगवर सिक्स मारण्यासाठी मोठा शॉट खेळला, यासाठी तो पुढे आला आणि बॉल लॉन्ग ऑनच्या वरून मारण्याचा प्रयत्नही केला, पण झेवियर बार्टलेटने हवेमध्ये उडी मारून उत्कृष्ट कॅच पकडला. बार्टलेटची उंची 6 फूट 2 इंच आहे, त्यामुळे हा कॅच पकडताना त्याला उंचीचा फायदाही झाला.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by IPL (@iplt20)



advertisement

बटलर तिसऱ्यांदा चहलची शिकार

आऊट झाल्यानंतर जॉस बटलरने त्याची बॅट हवेत उडवली. बार्टलेटने कॅच पकडल्यावर बटलरच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. बटलरने त्याच्या या इनिंगमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स मारल्या. टी-20 क्रिकेटमध्ये चहलने बटलरला तिसऱ्यांदा आऊट केलं आहे. बटलरने चहलविरुद्ध 10 इनिंगमध्ये 73 बॉल खेळून 90 रन केल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर युझवेंद्र चहलची ही पहिली मॅच होती, त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 28 रन दिल्या.
advertisement

गुजरातची बॅटिंग गडगडली

या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला यानंतर गुजरातला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 162 रन करता आल्या. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 39 रनची खेळी केली. पंजाब किंग्सकडून विजय कुमार वैश्यक याने 3 आणि युझवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 6 फुटी फिल्डर हवेत उडाला, बाऊंड्री लाईनवर चमत्कार घडला, बटलर बघतच राहिला, Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement