अखेर तो दिवस आलाच! उद्यापासून 4 राशींचं चमकणार नशीब, करिअर-फायनान्समध्ये होणार तगडा फायदा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह उद्या, 1 एप्रिल 2026 रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. पंचांगानुसार, बुध ग्रह गुरुच्या मालकीच्या 'पूर्वभाद्रपद' नक्षत्रात प्रवेश करणार असून तो या नक्षत्रात 13 एप्रिलपर्यंत विराजमान राहील.
advertisement
advertisement
वृषभ - अडकलेले पैसे मिळतील आणि नवीन डील: वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन आर्थिक लाभ घेऊन येईल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते 13 एप्रिलपर्यंत परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी वर्गाला एखादी मोठी व्यावसायिक डील फायनल करण्यात यश मिळेल, ज्यामुळे दीर्घकालीन नफा निश्चित होईल.
advertisement
मिथुन - करिअरमध्ये सुवर्णकाळ आणि बढती: मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध असल्याने हे गोचर तुमच्यासाठी वरदान ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळत आहेत. तुमची संवादशैली प्रभावी होईल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे.
advertisement
कन्या - बौद्धिक विकास आणि मानसन्मान: कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर समाजात मान-प्रतिष्ठा वाढवणारे ठरेल. तुमच्या निर्णयक्षमतेत कमालीची सुधारणा होईल. जे लोक शिक्षण, लेखन किंवा सल्लागार क्षेत्रात आहेत, त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठे यश मिळेल. जुन्या वादातून तुमची सुटका होईल आणि मानसिक शांती लाभेल.
advertisement
धनु - व्यवसायात विस्तार आणि कौटुंबिक सुख: धनु राशीचा स्वामी गुरु आहे आणि बुध त्याच्याच नक्षत्रात प्रवेश करत आहे. यामुळे तुम्हाला व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची विश्वासार्हता वाढेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










