advertisement

Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत चलो गोवा! मध्य रेल्वेवर धावणार विशेष एक्स्प्रेस, असं आहे नियोजन

Last Updated:

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुमचा सुद्धा कोकण किंवा गोव्यात फिरायचा प्लॅन असेल, तर एकदा बातमी नक्कीच वाचा. हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस चालवली जाणार आहे. या एक्सप्रेसच्या संपूर्ण टाईमटेबलबद्दल जाणून घेऊया...

News18
News18
मुंबई: एप्रिल आणि मे महिन्यातील सुट्ट्यांनिमित्त कोकण आणि गोव्याला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. जर तुमचाही गोव्याला फिरायला जायचा प्लॅन असेल आणि तुमचं तिकिट अजूनही जर कन्फर्म नसेल झालं तर, कोकण रेल्वेकडून हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसची घोषणा केलेली आहे. तर तुम्ही त्या ट्रेनच्या माध्यमातून फिरायला जाऊ शकणार आहेत. नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांनाही कोकण रेल्वेकडून दिलासा देण्यात आलेला आहे. जादा प्रवाशांची संख्या विभाजित करण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत समन्वय साधून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतून थेट कोकण आणि गोव्यात जाण्यासाठी, समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी या विशेष रेल्वेचा पर्यटकांना फायदा होणार आहे. येत्या 5 एप्रिलपासून प्रत्येक आठवड्याला मुंबई- गोवा या मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 01119 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दर रविवारी मध्यरात्री 12.55 मिनिटांनी सुटणारी ही हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी दुपारी मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तर, 01120 अप मडगाव रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता सुटणार आहे. तर हिच ट्रेन आता लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 03.30 वाजता पोहोचणार आहे.
advertisement
जर तुमचाही गोवा किंवा कोकण फिरण्याचा प्लॅन असेल तर, नक्कीच या एक्सप्रेसचा तुम्ही विचार करू शकणार आहेत. ही हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस ठाणे, दिवा, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि करमाळी सारख्या मुख्य स्थानकांवर थांबणार आहे. टू टियर एसी कोच 2, थ्री टियर एसी कोच 8, स्लीपर कोच 4, जनरल कोच 6 आणि जनरेटर कार 2 असं संपूर्ण एक्सप्रेसच्या डब्ब्यांची स्थिती असणा आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वच शाळकरी मुलांना आणि महाविद्यालयीन तरूणांना सुट्ट्या असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये जर तुमचाही कोकण किंवा गोवा फिरण्याचा प्लॅन असेल तर आवर्जुन हा प्लॅन तुम्ही करू शकणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत चलो गोवा! मध्य रेल्वेवर धावणार विशेष एक्स्प्रेस, असं आहे नियोजन
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement