IPL 2026 : सामना आयपीएलचा, पण बदला टीम इंडियातल्या हकालपट्टीचा... पंजाब-गुजरातमध्ये वेगळीच फाईट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 चा तिसरा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. पंजाबच्या मुल्लानपूरमध्ये हा सामना पार पडत आहे.
पंजाब किंग्सचं नेतृत्व श्रेयस अय्यर याच्याकडे तर गुजरातचा कॅप्टन शुभमन गिल आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळाली नव्हती, त्यामुळे दोघंही आयपीएलच्या या मोसमात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणि भारताच्या टी-20 टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी मैदानात उतरतील.
advertisement
advertisement
advertisement
या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आम्ही आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा मागील हंगाम विलक्षण होता, पण आता आपल्याला वर्तमानात राहणे गरजेचे आहे. जुन्या गोष्टींचा विचार करून चालणार नाही. आपल्याला आपली सर्वोत्तम कामगिरी (Best brand of cricket) करावी लागेल. कूपर संघात आला आहे. स्टोइनिस, बार्टलेट आणि मार्को जान्सेन हे आमचे इतर परदेशी खेळाडू आहेत, असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.
advertisement
"ही खेळपट्टी (विकेट) बऱ्यापैकी चांगली वाटतेय. गेल्या दोन दिवसांत अधूनमधून पाऊस पडला आहे, पण फलंदाजीसाठी ही एक चांगली खेळपट्टी असू शकते. आमचा गेल्या वर्षीचा हंगाम खूप छान होता. आज आमच्या संघात दोन खेळाडू पदार्पण (Debut) करत आहेत - ग्लेन आणि आशिक शर्मा. आमच्याकडे जोस बटलर, ग्लेन, रशीद खान आणि रबाडा हे चार परदेशी खेळाडू आहेत. जोस बटलर हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि मला खात्री आहे की हे वर्ष आमच्यासाठी आणि त्याच्यासाठी उत्तम ठरेल." असं गिल म्हणाला आहे.
advertisement
advertisement








