advertisement

Nashik: अशोक खरातची बायको पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाली, नाशिक पोलीस पुण्याच्या दिशेनं रवाना

Last Updated:

एकीकडे खरातचं कृत्य हे राज्यातलं संवेदनशील प्रकरण आहे. असं असताना खरातची बायको फरार कशी झाली यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.

News18
News18
नाशिक:  बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन प्रकरणं समोर येत आहे. अशातच आता शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात त्याची बायको कल्पना खरात हिचंही नाव समोर आलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खरातची बायको फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे खरातचं कृत्य हे राज्यातलं संवेदनशील प्रकरण आहे. असं असताना खरातची बायको फरार कशी झाली यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.
शिर्डीमध्ये जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरातसह त्याची बायको आणि इतर ३ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी सकाळीच २ जणांना अटक केली होती. पण, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आता समोर आली आहे.  शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाली आहे.  कल्पना खरातला अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहे.  कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
अशोक खरात याने शिर्डीतील शेतकऱ्याची जमिन बळकावल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींना राहाता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह पाच जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रावसाहेब गोंदकर या सामान्य शेतकऱ्याला सावकारकीच्या पाशात अडकवून त्याची कोट्यावधीची जमीन खरातने बळकावली आहे.
advertisement
पोलिसांनी पहाटे २ जणांना घेतलं होतं ताब्यात
विशेष म्हणजे, आज मंगळवारी पहाटे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नीसह ३ जणांविरोधात शिर्डी परिसरात बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल केला. फसवणूक आणि सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पाच पैकी दोघांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर अशोक खरात आधीपासूनच नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती खुद्द अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
advertisement
तसंच, "या गुन्ह्याचा सविस्तर तपास शिर्डी पोलीस करत आहे, जे काही पैशांचे व्यवहार आहे, जो तक्रारदार आहे, त्याला सावकारीच्या नात्याने पैसे दिले होते. एक मोठा व्याजदराने पैसे दिले होते. आणि त्याच्या बदल्यात जमिनीची खरेदी करून घेतली आहे.शिर्डी पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे. एकूण अशोक खरात, त्याची पत्नी आणि आणखी ३ जण आहे. यापैकी दोघांना अटक केली आहे. अशोक खरातला देखील न्यायालयाच्या परवानगीनंतर ताब्यात घेणार आहोत, असंही  सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितलं होतं.
advertisement
सकाळपर्यंत घरीच होती खरातची बायको
दरम्यान, शिर्डीतील फसवणूक प्रकरणांमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.  अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात ही नाशिकच्या घरून फरार असून तिच्या शोधासाठी नगर पोलिसांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे तर एक पथक पुण्याच्या दिशेनं रवाना झाल्याचे सूत्रांची माहिती आहे. मात्र आज मंगळवारी सकाळपर्यंत कल्पना खरात तिच्या राहत्या घरी असल्याची माहिती तिच्या घरात काम करणाऱ्या महिलेनं आणि वॉचमनने दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: अशोक खरातची बायको पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाली, नाशिक पोलीस पुण्याच्या दिशेनं रवाना
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement