advertisement

Success Story : इंजिनिअर सुद्धा फेल, बनवला असा टेबल की 12 प्रकारे येईल वापरता! वर्षाला 50 लाखांचा बिझनेस!

Last Updated:

उद्योजक दीपक केळुसकर यांनी एक अनोखा आणि बहुपयोगी स्टडी टेबल तयार केला आहे. हे टेबल एकाच वेळी 10 ते 12 विविध प्रकारे वापरता येते, हीच त्याची सर्वात मोठी खासियत ठरली आहे.

+
News18

News18

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात जागेची आणि सोयीची कमतरता लक्षात घेऊन, उद्योजक दीपक केळुसकर यांनी एक अनोखा आणि बहुपयोगी स्टडी टेबल तयार केला आहे. हे टेबल एकाच वेळी 10 ते 12 विविध प्रकारे वापरता येते, हीच त्याची सर्वात मोठी खासियत ठरली आहे. लहान आकाराच्या या टेबलचा वापर केवळ अभ्यासासाठीच नव्हे, तर ड्रॉइंग, लॅपटॉप वापरणे, मोबाईल ऑपरेट करणे, तसेच जेवणासाठीही करता येतो. याशिवाय, शरीराला आराम देण्यासाठी त्यावर डोके किंवा पाय ठेवून अर्धवट झोप घेण्याची सुविधा देखील आहे. त्यामुळे विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी आणि घरगुती वापरासाठी हे टेबल अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या टेबलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, भारतभर सध्या असे डिझाइन फक्त दीपक केळुसकर यांच्याकडेच उपलब्ध आहे. त्यांनी या उत्पादनाची संपूर्ण नोंदणी केली असून, त्याची डिझाइन आणि उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे युनिक आहे.
दीपक केळुसकर यांनी 1994-95 च्या सुमारास या टेबलची निर्मिती केली. त्या काळात ते फक्त दहावी शिक्षण घेतलेले होते. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा त्यांचा निर्धार होता. सुरुवातीला मार्केटिंग क्षेत्रात काम करताना स्वतःचे प्रॉडक्ट असावे या विचारातून त्यांनी सुतारकाम शिकले आणि विविध वस्तू तयार केल्या. त्यातूनच या मल्टी-यूज टेबलची कल्पना साकारली.
advertisement
सुरुवातीच्या काळात हे टेबल ते सुमारे 700 रुपयाला विकत होते, ज्याचा खर्च 500 रुपये होता. आज त्याच टेबलची किंमत सुमारे 2500 रुपयापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या टेबलमध्ये वापरण्यात येणारे मटेरियल उच्च दर्जाचे असून, माईल्ड स्टील स्ट्रक्चर, पावडर कोटिंग आणि मजबूत MDF बोर्डचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे टेबल 20 ते 25 वर्षे टिकाऊ राहते, असे ग्राहक सांगतात.
advertisement
याशिवाय, या टेबलवर तब्बल 300 किलोपर्यंत वजन ठेवता येते, ही एक अनोखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहे. प्रवासात देखील हे टेबल वापरण्यास सोयीचे असल्याचे सांगितले जाते. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून दीपक केळुसकर हे या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचे स्वतंत्र दुकान नसून, ते ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, कोकण आणि भारतातील इतर शहरांमध्ये आपली उत्पादने विक्रीस ठेवतात.
advertisement
या व्यवसायातून आज त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 25 ते 50 लाखांपर्यंत पोहोचली आहे. मर्यादित शिक्षण असूनही जिद्द, नवकल्पना आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी उभारलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : इंजिनिअर सुद्धा फेल, बनवला असा टेबल की 12 प्रकारे येईल वापरता! वर्षाला 50 लाखांचा बिझनेस!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement