advertisement

Eye Health : झोपेच्या कमतरतेचे डोळ्यांवर होतात परिणाम, डोळ्यांच्या आरोग्यासाठी झोप का महत्त्वाची ? वाचा सविस्तर माहिती

Last Updated:

आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी हवा आणि पाण्याइतकीच झोप आवश्यक आहे. आपण झोपतो, तेव्हा आपलं शरीर, विशेषतः आपले डोळे, स्वतःची दुरुस्ती करतात. झोपेच्या दरम्यान, डोळ्यांचे स्नायू शिथिल होतात, अश्रू ग्रंथी सक्रिय होतात आणि रेटिनाला पोषण मिळतं.

News18
News18
मुंबई : झोप म्हणजे शरीराची विश्रांती आणि दुरुस्तीची वेळ असते. यात काही बिघाड झाला तर प्रकृतीवर त्याचे परिणाम लगेच दिसून येतात.
झोप किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी हवा आणि पाण्याइतकीच झोप आवश्यक आहे. आपण झोपतो, तेव्हा आपलं शरीर, विशेषतः आपले डोळे, स्वतःची दुरुस्ती करतात. झोपेच्या दरम्यान, डोळ्यांचे स्नायू शिथिल होतात, अश्रू ग्रंथी सक्रिय होतात आणि रेटिनाला पोषण मिळतं.
पण पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा या सर्व प्रक्रिया विस्कळीत होतात. त्यामुळे, तुम्हीही झोपेकडे दुर्लक्ष करून रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर वेळ घालवत असाल तर याचा परिणाम केवळ मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरच नाही, तर दृष्टीवरही होतो हे समजून घ्यायला हवं.
advertisement
रेटिनावर होणारे परिणाम: झोपेच्या वेळी रेटिना स्वतःची दुरुस्ती करतो. अपुऱ्या झोपेमुळे रेटिना कमकुवत होऊ शकतो, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.
कमी झोपेचे इतर दुष्परिणाम:
स्मरणशक्ती कमी होणं आणि लक्ष केंद्रित न होणं.
advertisement
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणं.
हृदयविकाराचा धोका वाढणं.
मनोवस्थेत चढ-उतार आणि नैराश्य
झोपेच्या कमतरतेचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. पण, त्याचा डोळ्यांवर थेट आणि जलद परिणाम होतो. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिननुसार, झोपेच्या वेळी डोळे स्वतःची दुरुस्ती करतात. जर तुम्हाला दररोज सात-आठ तास झोप मिळाली नाही, तर तुमचे डोळे थकलेले, लाल आणि कमजोर होऊ शकतात.
advertisement
डोळ्यांच्या संरक्षणासाठी टिप्स -
दररोज सात-आठ तास झोप घ्या.
झोपण्यापूर्वी स्क्रीन पाहण्याचा वेळ कमी करा.
डोळ्यांना आराम देणारे व्यायाम करा.
आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई चा समावेश करा.
झोपेच्या कमतरतेमुळे दृष्टी हळूहळू कमकुवत होऊ शकते. त्यामुळे, चांगली दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायामाइतकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eye Health : झोपेच्या कमतरतेचे डोळ्यांवर होतात परिणाम, डोळ्यांच्या आरोग्यासाठी झोप का महत्त्वाची ? वाचा सविस्तर माहिती
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement