Success Story : आवडीला दिलं व्यवसायाचं रूप, अर्चना घरातून बनवतात हर्बल प्रोडक्ट, आता महिन्याला एवढी कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
काही महिलांची स्वतः काहीतरी करण्याची इच्छा असते म्हणून देखील काही महिला स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करत असतात. अशीच इच्छा छत्रपती संभाजीनगर शहरातील अर्चना धाबे यांना देखील होती म्हणून त्यांनी स्वतःचा एक हर्बल प्रॉडक्टचा व्यवसाय सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : अनेक महिलांची इच्छा असते की आपला स्वतःचा काहीतरी छोटा का होईना व्यवसाय असावा किंवा नोकरी करावी जेणेकरून आपल्या कुटुंबाला त्याचा हातभार लागेल. तर काही महिलांची स्वतः काहीतरी करण्याची इच्छा असते म्हणून देखील काही महिला स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करत असतात. अशीच इच्छा छत्रपती संभाजीनगर शहरातील अर्चना धाबे यांना देखील होती म्हणून त्यांनी स्वतःचा एक हर्बल प्रॉडक्टचा व्यवसाय सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील अर्चना धाबे यांनी स्वतःचा हर्बल धाबे नावाने एक कॉस्मेटिक प्रॉडक्टचा व्यवसाय सुरू केला आहे. याच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल प्रॉडक्टची विक्री करतात ज्यामध्ये एलोवेरा जेल, अव्होकॅडो क्रीम, नॅचरल मेहंदी, फेशियल किट, एक स्पेशल ऑइल आणि उटणं. एवढ्या सगळ्या प्रॉडक्टची त्या विक्री करतात.
सुरुवातीला त्यांनी फक्त सुगंधी उटण्यापासून सुरुवात केली होती. आणि त्यांच्या सुगंधी उटणे सुरुवातीला खूप मागणी आली. त्यानंतर त्यांनी हळूहळू हे सर्व प्रॉडक्ट वाढवत गेल्या. एकदम नॅचरल पद्धतीने ते सर्व हे प्रॉडक्ट घरीच तयार करतात. त्यांचं कुठे शहरामध्ये शॉप नाही आहे त्या घरामधूनच त्याची सर्व विक्री करतात.
advertisement
शहरामध्ये कुठेही एक्झिबिशन असेल तर त्या ठिकाणी त्यांचा स्टॉल हा असतो. यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मदत करतात. याच्या माध्यमातून त्यांनी दोन ते चार महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेला आहे. आणि साधारणपणे महिनाकाठी त्या 50 ते 60 हजारापर्यंत कमाई करतात. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. मी जो व्यवसाय स्वतःसाठी सुरू केला होता आणि त्यातून मी आज महिलांना रोजगार देऊ शकते आणि माझ्यामुळे कुठलातरी महिलेचा कुटुंबाला आधार देऊ शकतो याचा मला खूप आनंद आहे, असं अर्चना यांनी सांगितले आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 9:10 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : आवडीला दिलं व्यवसायाचं रूप, अर्चना घरातून बनवतात हर्बल प्रोडक्ट, आता महिन्याला एवढी कमाई







