advertisement

मुंबई क्रिकेटवर शोककळा!सचिनचं पहिलं शतक आलं होतं त्यांच्या बॅटने...अनिल गुरव यांचं निधन

Last Updated:

रमाकांत आचरेकर स्वत:सचिन तेंडुलकरला त्यांच्या फलंदाजी पाहायला सांगायचे.सचिन तेंडुलकर जेव्हा शिवाजी पार्कवर सरावासाठी यायचा, तेव्हा तो त्यांना अनिल सर म्हणायचा.

anil gurav passed away
anil gurav passed away
Mumbai Former Cricketer Anil Gurav Passed Away : क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ज्यांना सर म्हणायचा आणि ज्यांच्या बॅटीने त्याने आपल्या कारकिर्दितील पहिले शतक ठोकले, ते दिग्गज खेळाडू अनिल गुरव यांचे निधन झालं आहे.त्यामुळे क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मुंबई क्रिकेटमध्ये अनिल गुरव हे मोठं नाव होतं. कारण रमाकांत आचरेकर स्वत:सचिन तेंडुलकरला त्यांच्या फलंदाजी पाहायला सांगायचे.सचिन तेंडुलकर जेव्हा शिवाजी पार्कवर सरावासाठी यायचा, तेव्हा तो त्यांना अनिल सर म्हणायचा.
अनिल गुरव यांची फलंदाजीची शैली इतकी जबरदस्त होती की, त्यांची तुलना वेस्ट इंडिजच्या विव्ह रिचर्डशी यांच्याशी व्हायची. तसेच ज्या बॅटीने सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दितले पहिले शतक ठोकले, ती बॅट अनिल गुरव यांनीच त्याला दिली होती.
advertisement
दरम्यान ज्या काळात सचिन तेंडुलकर आपल्या यशशिखरावर होता,त्याच काळात अनिल गुरव क्रिकेटच्या मुळ प्रवाहातून बाहेर पडले होते. कारण चुकीची सोबत आणि दारूच्या व्यसनामुळे अनिल गुरव यांचे क्रिकेट करिअर उद्ध्वस्त झाले. त्यानंतर अनिल गुरव नालासोपाऱ्यातील एका छोट्याशा चाळीत अत्यंत गरिबीत जीवन जगत होते.पण आज अखेर त्यांची प्राणज्योत माळवली आहे.
रमाकांत आचरेकर सर यांनी 'स्टम्पवर नाणे ठेवण्याची'जी पद्धत सूरू केली, जिथे बाद न होणाऱ्या फलंदाजांना मिळायची, ती पद्धत अनिल गुरव यांच्यासाठी सूरू केली. जी नंतर सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही गाजली होती. दरम्यान आता अनिल गुरव यांच्या निधनानंतर क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मुंबई क्रिकेटवर शोककळा!सचिनचं पहिलं शतक आलं होतं त्यांच्या बॅटने...अनिल गुरव यांचं निधन
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement