advertisement

मल्लिका, नूर अन् चांदणी, पाकिस्तानी विषारी क्रीम्सची छ.संभाजीनगरमध्ये उघड्यावर विक्री, थेट किडनीवर होतोय 'हल्ला'

Last Updated:

शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सचा सुळसुळाट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि सिटी चौक पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर:  पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर केंद्र सरकारची कडक बंदी आहे. पण तरीही छत्रपती संभाजीनगर शहरात या वस्तूंची सर्रास विक्री सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सिटी चौक परिसरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ६० हजार रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त करण्यात आल असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालंय कारण या क्रिम्समुळे थेट किडनीवर परिणाम होत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
advertisement
शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सचा सुळसुळाट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि सिटी चौक पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील तीन दुकानांवर एकाच वेळी धाड टाकली.‘हायलाईट कलेक्शन’, ‘ओम ट्रेडर्स’ आणि ‘फलक इम्पोरियम’ या दुकानांमधून मल्लिका, गोल्डन पर्ल, नूर हर्बल, चांदणी यांसारखी क्रीम्स, साबण आणि सिरम जप्त करण्यात आले.
advertisement
या कारवाईत एकूण ५९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल आणि या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
क्रीममुळे किडनीवर परिणाम
मात्र या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या क्रीम्सचा आरोग्यावर होणारा परिणाम. गोरं होण्यासाठी या क्रीम्सचा वापर करणाऱ्या काही तरुण-तरुणींनी आरोग्य बिघडल्याचा दावा केला आहे. पण गोरं होणं तर दूर, या क्रीम्समुळे थेट किडनीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे… किडनी विकार तज्ञ डॉक्टरांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
advertisement
कोणत्या होत्या त्या क्रीम
त्वचा गोरी करण्याच्या नादात नागरिक स्वतःच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचं चित्र आहे. तज्ञांच्या मते अशा क्रीम्समध्ये घातक रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेचं नुकसान होण्यासोबतच किडनीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
पाकिस्तानी क्रीमचा सुळसुळाट
मल्लिका क्रीम
झलक क्रीम
ग्लोरी क्रीम
गोल्डन पर्ल क्रीम
चांदणी क्रीम
उजूबा क्रीम
फेस फ्रेश क्रीम
advertisement
नूर हर्बल क्रीम
न्यू फेस ब्युटी क्रीम
साबण आणि सिरम :
पारले गोल्ड साबण
ग्लोरी साबण
मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम
धक्कादायक म्हणजे, या सगळ्या क्रीम आणि सिरमवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पण, चोरून हे क्रीम्स आणि सिरम छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं पोहोचलं हा मोठा प्रश्न आहे. गोरं होण्याच्या हव्यासापोटी आपण स्वतःच्या आरोग्याशी खेळ तर करत नाही ना? कारण अशा क्रीम्समुळे सौंदर्य वाढत नाही. उलट शरीराला गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा उत्पादनांपासून दूर राहणं हाच खरा सुरक्षित पर्याय आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मल्लिका, नूर अन् चांदणी, पाकिस्तानी विषारी क्रीम्सची छ.संभाजीनगरमध्ये उघड्यावर विक्री, थेट किडनीवर होतोय 'हल्ला'
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement