advertisement

Iran US Conflict: आज रात्री ८ वाजता.... टार्गेट आणि वेळ ठरवली! गुगल, अॅपलसह १८ टेक कंपन्यांवर इराण थेट करणार हल्ला

Last Updated:

Iran War: इराणने आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढली. त्यानंतर आता इराणने नवी हिटलिस्ट तयार केल्याचे वृत्त आहे.

आज रात्री ८ वाजता... टार्गेट आणि वेळ ठरवली! गुगल, अॅपलसह १८ टेक कंपन्यांवर इराण थेट करणार हल्ला
आज रात्री ८ वाजता... टार्गेट आणि वेळ ठरवली! गुगल, अॅपलसह १८ टेक कंपन्यांवर इराण थेट करणार हल्ला
तेहरान: अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध पुकारून महिना उलटला आहे. या महिनाभरात युद्धाची तीव्रता वाढत आहे. इराणने अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणने आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढली. त्यानंतर आता इराणने नवी हिटलिस्ट तयार केल्याचे वृत्त आहे. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही धक्का बसण्याची शक्यता असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर, आता इराणने आपला मोर्चा थेट अमेरिकेतील बड्या टेक कंपन्यांकडे वळवला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) मंगळवारी (३१ मार्च २०२६) गुगल आणि मायक्रोसॉफ्टसह १८ प्रमुख अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करण्याची उघड धमकी दिली आहे. या इशाऱ्यामुळे आता जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कोणत्या कंपन्यांना इराणकडून धोका?

advertisement
IRGC ने स्पष्ट केले आहे की, जर भविष्यात कोणत्याही इराणी नेत्याची हत्या झाली, तर खाडी देशांतील अमेरिकन कंपन्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणच्या हिटलिस्टमध्ये ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, टेस्ला, इंटेल, सिस्को, एचपी, ओरॅकल, आयबीएम, डेल, पालेंटिर, एनवीडिया, जेपी मॉर्गन, जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्यूशन्स, G42 आणि बोइंग यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.
advertisement

आयटी कंपन्यांना टार्गेट करण्याचे काय?

इराणच्या दाव्यानुसार, या तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्या अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना मदत करत आहेत. विशेषत: आयटी आणि एआय (AI) क्षेत्रातील कंपन्यांचा वापर इराणविरुद्ध कारस्थान करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप IRGC ने केला आहे. यामध्ये 'OpenAI' आणि 'Anthropic' सारख्या आघाडीच्या संस्थांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement

जनरल जमशेद इशाकी यांच्या हत्येचा बदला?

इराणचे ब्रिगेडियर जनरल जमशेद इशाकी यांच्या हत्येनंतर IRGC आता आक्रमक झाल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकन-इस्रायली हवाई हल्ल्यात इशाकी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी IRGC ने केली आहे. इशाकी हे जनरल स्टाफचे मुख्य सल्लागार होते आणि गेल्या वर्षी अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले होते. या हत्येचा बदला म्हणून आता इराण सायबर किंवा प्रत्यक्ष हल्ल्यांद्वारे या कंपन्यांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: आज रात्री ८ वाजता.... टार्गेट आणि वेळ ठरवली! गुगल, अॅपलसह १८ टेक कंपन्यांवर इराण थेट करणार हल्ला
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement