advertisement

जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन घरी निघाले, पण रात्री सव्वाबारा वाजता दिवेघाटात भयंकर घडलं, बाप-लेकीचा मृत्यू

Last Updated:

दर्शन घेऊन परतत असताना मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दिवे घाटातील देवाची उरुळी परिसरात पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

जेजुरीवरून देवदर्शन करून येताना दिवेघाटात काळाचा घाला (फाईल फोटो)
जेजुरीवरून देवदर्शन करून येताना दिवेघाटात काळाचा घाला (फाईल फोटो)
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. यात पुण्याच्या उंड्री-पिसोळी परिसरात राहणाऱ्या गंगावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन मध्यरात्री घरी परतत असताना, दिवे घाटात एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १२ वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी वडिलांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. या घटनेत ८ वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला असून तो जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
सुंदर कैलास गंगावणे (वय ३३) हे आपली मुलगी अनन्या (वय १२) आणि मुलगा सोहम (वय ८) यांच्यासह जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दिवे घाटातील देवाची उरुळी परिसरात पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अनन्या ट्रकच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सुंदर गंगावणे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
advertisement
ट्रक चालकाला अटक
याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रक चालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. लातूर) याला अटक केली आहे. अश्विनी उत्तम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, घाटातील वेगमर्यादा आणि चालकाचा निष्काळजीपणा यावर तपास केंद्रित केला आहे.
advertisement
एकाच वेळी बाप-लेकीचा मृत्यू झाल्याने उंड्री-पिसोळी परिसरात शोककळा पसरली आहे. खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आनंदाने घरी येणाऱ्या या कुटुंबाचा असा शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन घरी निघाले, पण रात्री सव्वाबारा वाजता दिवेघाटात भयंकर घडलं, बाप-लेकीचा मृत्यू
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement