Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? स्वत: पंजाब किंग्जच्या कॅप्टनने दिली अपडेट! प्रिती झिंटाला टेन्शन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer breaks silence on scary wrist injury : पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरने आपल्या हाताच्या दुखापतीवर महत्त्वाची अपडेट दिली आहे. काय म्हणाला सरपंच?
Shreyas Iyer injury, GT vs PBKS : पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जने पाईंट्स टेबलमधील आपलं खातं उघडलं आहे. गुजरातचा 3 विकेट्सने पराभव करत पंजाबने 2 अंक आपल्या खात्यात जमा केले. 18 व्या ओव्हरमध्ये गुजरातकडे झुकलेला सामना 19 व्या ओव्हरमध्ये पुन्हा पंजाबकडे वळाला. यात कूपर कॉनोली आणि श्रेयस अय़्यर यांची भूमिका महत्त्वाची राहिली. परंतू मॅचवेळी श्रेयस अय्यर याला गंभीर दुखापत झाल्याचं पहायला मिळालं.
श्रेयसच्या हाताला बॉल लागला अन्...
झालं असं की, 163 धावांचं आव्हान पंजाब किंग्ज चेस करत होती. त्याचवेळी दोन विकेट गेल्यानंतर खुद्द कॅप्टन श्रेयस अय्यर मैदानात आला. श्रेयस अय्यरने आक्रमक सुरूवात केल्याने गुजरातमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्याचवेळी कूपर कॉनोलीकडून एक चूक झाली. कूपर कॉनोलीने बॉल थेट श्रेयसच्या अंगावर मारला. आधीच दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरने बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याच्या हाताला बॉल लागला. हाताला बॉल लागल्यानंतर तो वेदनेने व्हिवळत होता.
advertisement
सर्व काही व्यवस्थित होईल - श्रेयस अय्यर
हाताला लागल्यानंतर देखील श्रेयसने हार मानली नाही. तो बॅटिंग करतच राहिला. पण पुढच्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट गेली. मॅच पंजाब किंग्जने जिंकली पण श्रेयसच्या दुखापतीची चिंता सर्वांना वाटत होती. त्यावर आता खुद्द श्रेयसनेच प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयस अय्यरने सांगितले की, आता मला बरे वाटत असून दुखापतीची स्थिती पूर्वीसारखीच सामान्य आहे. मला या विषयावर जास्त बोलून कशाचीही दृष्ट लावायची नाही. सध्या मी फक्त सकारात्मक राहण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि सर्व काही व्यवस्थित होईल, अशी आशा देखील श्रेयसने यावेळी व्यक्त केली आहे.
advertisement
पंजाब किंग्जकडे कॅप्टनच उतला नाहीये
अशातच आता, प्रिती झिंटासह पंजाब किंग्जच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. जर श्रेयस अय्यर दुखापतीमधून बाहेर गेला तर पंजाब किंग्जकडे कॅप्टनच उतला नाहीये. श्रेयस अय्यर पंजाबचा सर्वात घातक आणि प्रभावी खेळाडू आहे. एवढंच नव्हे तर त्याची स्मार्ट कॅप्टन्सीने सर्वजण प्रभावीत आहेत. अशातच श्रेयस अय्यर लवकर बरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 8:02 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? स्वत: पंजाब किंग्जच्या कॅप्टनने दिली अपडेट! प्रिती झिंटाला टेन्शन







