advertisement

GT vs PBKS : 18 व्या ओव्हरपर्यंत जिंकलेली मॅच गमावली, संतापलेल्या शुभमनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर? कोण ठरला व्हिलन!

Last Updated:

GT vs PBKS, Shubman Gill Statement : "मी म्हणत नाही की, 210 स्कोर करणारी ही विकेट होती. पण आम्ही 175 पर्यंत जायला पाहिजे होतं", असं शुभमन गिल म्हणाला. त्यावेळी त्याने प्रसिद्ध कृष्णाचं देखील कौतुक केलं.

GT vs PBKS, Shubman Gill Statement
GT vs PBKS, Shubman Gill Statement
Gujarat Titans Captain Shubman Gill : पंजाबच्या न्यू चंदीगड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळलेल्या गेलेल्या सामन्यात सरपंच श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. 19 व्या ओव्हरपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जच्या कूपर कॉनोलीने अफलातून 72 धावांची खेळी करून पंजाबला पहिल्याच सामन्यात विजय मिळून दिला आहे. अशातच पराभवानंतर शुभमन गिल काहीसा संतापल्याचं पहायला मिळालं. काय म्हणाला गुजरात टायटन्सचा कॅप्टन?

शुभमन गिल काय म्हणाला?

मला वाटतं की, आम्ही आज चांगली बॉलिंग केली. पण आम्हाला बॅटिंगमध्ये शेवटच्या पाच सहा ओव्हरमध्ये पाहिजे तशी लय मिळाली नाही. मी म्हणत नाही की, 210 स्कोर करणारी ही विकेट होती. पण आम्ही 175 पर्यंत जायला पाहिजे होतं, असं शुभमन गिल म्हणाला. त्यावेळी त्याने प्रसिद्ध कृष्णाचं देखील कौतुक केलं.
advertisement

आज नशिबाने साथ दिली नाही - शुभमन गिल

एकदा का बॉल जुना झाला की ग्राऊंडवर शॉट्स मारणं चॅलेन्जिंग होतं, पण दुसऱ्या डावात पाऊस पडल्यामुळे बॉल ओला झाला आणि समोरच्या टीमसाठी बॅटिंग करणं थोडं सोपं झालं. आम्ही चांगली कामगिरी केली पण आज नशिबाने साथ दिली नाही, असं म्हणत शुभमन गिलने नशिबावर पराभवाचं खापर फोडलं नाही.
advertisement

अशोक शर्मा एक 'गुड फाईंड'

शुभमन या मॅचमध्ये अशोक शर्मा याच्या कामगिरीने प्रभावित झाला असून त्याने अशोकचे विशेष कौतुक केलं आहे. अशोकने सुरुवातीच्या स्पेलमध्ये चांगली बॉलिंग केली असून तो एक 'गुड फाईंड' असल्याचं गिलनं म्हटलं आहे; भविष्यात अधिक अनुभव मिळाल्यावर तो टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरेल, असा विश्वास शुभमन गिलने व्यक्त केला.
advertisement

सर्वोत्तम प्रयत्न करण्याची गरज - शुभमन गिल

दरम्यान, वेल डन बॉईज, आज नशिबाने साथ दिली नाही, पण आपण चांगली झुंज दिलीय. आता खचून न जाता सातत्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याची गरज आहे, असं म्हणत शुभमन गिलने खेळाडूंना प्रोत्साहित केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
GT vs PBKS : 18 व्या ओव्हरपर्यंत जिंकलेली मॅच गमावली, संतापलेल्या शुभमनने कुणावर फोडलं पराभवाचं खापर? कोण ठरला व्हिलन!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement