advertisement

Rinku Singh : मैदानात हार्दिकला लुटलं! ड्रेसिंग रुममध्ये सूर्याची बॅट ढापली, कॅमेरा दिसताच धूम ठोकून पळाला रिंकु सिंग! Video

Last Updated:

Rinku Singh Asking For Bat In MI dressing Room : सोशल मीडियावर दोन व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यात रिंकु सिंग मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्सची बॅट पळवून नेताना दिसतोय.

Rinku Singh Asking For Bat In MI dressing Room
Rinku Singh Asking For Bat In MI dressing Room
Rinku Singh Asking For Bat : माझी बॅट स्पिनर्सला मारताना तुटली म्हणत रिंकु सिंगने विराट कोहलीकडून बॅट घेतल्याचा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. तसेच आयपीएल आली की सर्वजण एका खेळाडूपासून सावध राहतात, तो म्हणजे रिंकु सिंग... स्टार खेळाडूंकडून बॅट ढापण्याची कला रिंकु सिंगला चांगलीच अवगत आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीपासून आता सूर्याची बॅट रिंकु घेऊन पळाल्याचं पहायला मिळालंय. केकेआर आणि मुंबई यांच्यातील मॅचनंतर रिंकु सिंग सिंगने आपल्या पर्सनल कामाला सुरूवात केली अन् मॅच जिंकल्या जिंकल्या हार्दिक पांड्याची बॅट मारली.

चतुराईने हार्दिकच्या हातातली बॅट घेतली

मॅच झाल्यानंतर हँडशेक करताना हार्दिक आणि रिंकु आमने सामने आल्यानंतर रिंकूने चतुराईने हार्दिकच्या हातातली बॅट घेतली अन् थेट ड्रेसिंग रुमकडे वाटचाल केली. त्यानंतर रिंकु इथंच थांबला नाही. केकेआरचा युवा प्लेयर अंगक्रिश रघुवंशी याच्यासह रिंकु मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये घुसला. तिथं त्याने सूर्याला टार्गेट केलं. अंगक्रिश रघुवंशी याने सूर्याची बॅट चेक केली.
advertisement
advertisement

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधून पळाला

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचनंतर मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर 21 सेकंदांची एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये सुरुवातीला अंगक्रिश रघुवंशी बॅटने बॉल चेक करताना दिसत आहे, जवळच उभा असलेला रिंकू सिंह हे सर्व शांतपणे पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. रिंकू सिंह कॅमेऱ्यासमोर येतो आणि म्हणतो, "ही माझी बॅट नाही, ही फिनल एलनची बॅट आहे", असं म्हणत रिंकू बॅट घेऊन मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधून बाहेर पडताना दिसतो. त्यावेळी तिलक वर्मा त्याला ओरडताना दिसतोय.
advertisement

अरे, अजून किती बॅट्स घेणार?

दरम्यान, "अरे, अजून किती बॅट्स घेणार? इकडं ये... दाखव तरी." त्यावर रिंकू मागे वळून पाहतो, पण काहीही उत्तर न देता गमतीने आपल्या ड्रेसिंग रूमकडे निघून जातो. रिंकूची ही बॅटची आवड पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. त्याचा मजेरशीर व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rinku Singh : मैदानात हार्दिकला लुटलं! ड्रेसिंग रुममध्ये सूर्याची बॅट ढापली, कॅमेरा दिसताच धूम ठोकून पळाला रिंकु सिंग! Video
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement