advertisement

Kokani Curry : तुम्ही खाल्लीय कोकणातली पारंपरिक कोवळ्या फणसाची फूस भाजी? चव भन्नाट, बनवायला सोपी

Last Updated:

एक वेगळी आणि हटके भाजी आहे. ती म्हणजे, कोवळ्या फणसाची फूस भाजी. ही कोकणातली एक पारंपरिक रेसिपी आहे. याची चव तुम्हाला नक्की आवडेल.

पारंपरिक कोवळ्या फणसाची फूस भाजी
पारंपरिक कोवळ्या फणसाची फूस भाजी
मुंबई : आपल्या घरात रोज बटाटे, टोमॅटो, भेंडी, वांगी अशा भाज्या बनतात. फारच वेगळं काही करायच असेल चिकन, मटण, मासे, पनीर, काजूकारी अशा भाज्या आपण करतो. पण यापेक्षाही एक वेगळी आणि हटके भाजी आहे. ती म्हणजे, कोवळ्या फणसाची फूस भाजी. ही कोकणातली एक पारंपरिक रेसिपी आहे. याची चव तुम्हाला नक्की आवडेल.
फणस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात. म्हणून फणस अधून मधून खायला पाहिजे. फणसाच्या फूस भाजीची ही रेसिपी trisakhi1 या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे.
फणसाच्या फूस भाजीसाठी लागणारं साहित्य..
फणसाची फूस भाजी बनवण्यासाठी तुम्हाला फणस, पाणी, मीठ, हळद, कढीपत्ता, जिरं, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, तिखट, धणेपूड, ओल्या नारळाचा किस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एवढं साहित्य लागेल.
advertisement
अशी बनवा फणसाची फूस भाजी..
- सर्वात आधी आपल्याला फणस चिरून घ्यायचा आहे. यासाठी हाताला आणि सुरीला तेल लावा.
- त्यानंतर फणसाची साल काढून त्याचे माध्यम आकाराचे तुकडे करा.
- आता हे फणसाचे तुकडे धुवून घ्या.
- गॅसवर कुकर ठेवा आणि त्यामध्ये हे फणसाचे तुकडे टाका.
- यावर पाणी, मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित एकत्र करा.
advertisement
- फणसाचे तुकडे शिजल्यानंतर ते बाहेर काढून मॅशरच्या साहाय्याने ते क्रश करा.
- या फणसाच्या तुकड्यांचे याचे रेषा रेशसारखे मिश्रण तयार होईल.
- आता गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल टाका.
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.
- कांदा सोनेरी होत आल्यावर त्यामध्ये हळद, तिखट, धणेपूड, शिजवलेला फणस टाकून एकत्र करा.
advertisement
- हे सर्व झाकण ठेऊन थोडावे शिजवून घ्या.
- नंतर यामध्ये वरून ओल्या नारळाचा किस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.



 










View this post on Instagram























 

A post shared by Trisakhi🍽️ (@trisakhi1)



advertisement
अशापद्धतीने तयार आहे तुमची पारंपरिक कोकणी पद्धतीची कोवळ्या फणसाची फूस भाजी. ही भाजी घरात सगळ्यांना नक्की आवडेल. एखादेवेळी काहीतरी वेगळं खायची इच्छा असल्यास ही रेसिपी नक्की ट्राय करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kokani Curry : तुम्ही खाल्लीय कोकणातली पारंपरिक कोवळ्या फणसाची फूस भाजी? चव भन्नाट, बनवायला सोपी
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement