बजरंग भक्त कन्फ्युजन सोडा, 'याच' तारखेला साजरी होणार हनुमान जयंती! आत्ताच नोट करा डेट आणि शुभ मुहूर्त
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात 'संकटमोचन' हनुमान यांच्या जन्मोत्सवाला अत्यंत महत्त्व आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा ही तारीख 1 एप्रिल आहे की 2 एप्रिल, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Hanuman Jayanti Date : हिंदू धर्मात 'संकटमोचन' हनुमान यांच्या जन्मोत्सवाला अत्यंत महत्त्व आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा ही तारीख 1 एप्रिल आहे की 2 एप्रिल, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पौर्णिमा तिथी दोन दिवसांत विभागली गेली आहे. मात्र, शास्त्रातील 'उदया तिथी' आणि हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला असल्याने, यंदा हनुमान जयंती कधी साजरी करणे शास्त्रशुद्ध ठरेल जाणून घेऊ.
तारीख आणि तिथीचा गोंधळ
पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 07:07 वाजता सुरू होईल आणि 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 07:41 वाजता समाप्त होईल. जरी 1 एप्रिल या दिवशी पूर्ण दिवस पौर्णिमा असली, तरी सूर्योदय चतुर्दशीला झालेला असेल. 2 एप्रिल या दिवशी सूर्योदय पौर्णिमा तिथीमध्ये होणार आहे. शास्त्रानुसार, हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता, म्हणून ज्या दिवशी सूर्योदयाला पौर्णिमा असते, त्याच दिवशी 'हनुमान जन्मोत्सव' साजरा केला जातो. त्यामुळे देशभरात 2 एप्रिल 2026 रोजीच हनुमान जयंती हा सण मोठ्या थाटात साजरा होईल.
advertisement
पूजेचा शुभ मुहूर्त आणि सुवर्ण काळ
हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटेपासूनच पूजेला सुरुवात होते. विशेषतः सूर्योदयाच्या वेळी केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. 2 एप्रिल 2026, सकाळी 06:10 ते 07:41 पर्यंतचा हा काळ पूजेसाठी सर्वात शक्तीशाली आहे, कारण यानंतर पौर्णिमा तिथी संपणार आहे. दुपारी 12:12 ते 01:02 या काळात ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य नाही, ते या काळात 'सुंदरकांड' किंवा 'हनुमान चालीसा'चे पठण करू शकतात. सकाळी 06:13 ते 09:23 या काळात केलेली भक्ती जीवनातील सर्व संकटे दूर करणारी ठरते.
advertisement
हनुमान जयंती पूजा विधी आणि नियम
बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
स्नान आणि संकल्प: 2 एप्रिल रोजी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. हनुमानासमोर बसून व्रताचा संकल्प करावा.
नैवेद्य: हनुमानाला बूंदीचे लाडू, चिरोटा किंवा शेंदूर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यांना 'रुईच्या पानांचा' हार घालणे आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते.
advertisement
पठण: या दिवशी कमीत कमी 7, 11 किंवा 108 वेळा हनुमान चालीसा वाचावी. जर तुम्हाला शत्रूचा त्रास असेल किंवा कामे रखडत असतील, तर 'बजरंग बाण' वाचणे फायदेशीर ठरेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 1:51 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
बजरंग भक्त कन्फ्युजन सोडा, 'याच' तारखेला साजरी होणार हनुमान जयंती! आत्ताच नोट करा डेट आणि शुभ मुहूर्त










