advertisement

लेकीने विजय शिवतारेंना दिलं नवजीवन, जावई शिवदीप लांडेंची मन हेलावणारी प्रतिक्रिया, म्हणाले...

Last Updated:

शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे मागील काही वर्षांपासून किडनी विकाराने ग्रस्त होते. मुलगी डॉ. ममता शिवतारेंनी किडनी दान केल्याने शिवतारेंना नवजीवन मिळालं आहे.

आमदार शिवतारेंवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
आमदार शिवतारेंवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी
शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे मागील काही वर्षांपासून किडनी विकाराने ग्रस्त होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सातत्याने डायलिसीस करावं लागत होतं. दिवसेंदिवस त्यांचा हा त्रास वाढतच जात होता. मात्र आता सोमवारी शिवतारे यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची मुलगी डॉ. ममता शिवतारे यांनीच त्यांना किडनी दान करत नवं आयुष्य दिलं आहे. राजकीय नेत्याच्या मुलीनं अशाप्रकारे किडनी दान केल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
आता या सगळ्यावर ममता यांचे पती आणि विजय शिवतारे यांचे जावई माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ममता यांनी आपल्या वडिलांसाठी घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये आपल्या आयुष्यातील अनेक संकटांचा उल्लेख करत, मी अनेक कठीण प्रसंगांना सामोरा गेलो, पण तुझ्या एका निर्णयाने मला आतून हलवून टाकलं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
शिवदीप लांडे यांनी पुढे लिहिले की, गेल्या तीन महिन्यांपासून शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या तपासण्या, कागदपत्रांची प्रक्रिया आणि कायदेशीर अडचणी ममता यांनी एकट्याने सांभाळल्या. त्या सर्व प्रक्रियेत ते फक्त एक साक्षीदार म्हणून उभे होते. देव मुलगी का देतो, याचे उत्तर मला आज मिळाले, असे म्हणत त्यांनी मुलीच्या निःस्वार्थ प्रेमाचे कौतुक केले.

मुलगी ही देवाची सर्वात मोठी देणगी

advertisement
आयसीयूमध्ये पत्नीच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहताना भावनांना आवर घालता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. नात्यांमध्ये अनेकजण साथ सोडू शकतात, पण मुलगी मात्र ठाम उभी राहते, असे ते म्हणाले. ममता शिवतारेंच्या या निर्णयामुळे, मुलगी ही देवाची सर्वात मोठी देणगी आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेकीने विजय शिवतारेंना दिलं नवजीवन, जावई शिवदीप लांडेंची मन हेलावणारी प्रतिक्रिया, म्हणाले...
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement