advertisement

याला म्हणतात स्मार्ट शेती! धुळ्याच्या शिरीषने टायमिंग साधला, या पिकातून फक्त ६५ दिवसांत कमवले ८ लाख रुपये

Last Updated:

Farmer Success Story : पारंपरिक पिकांतील अनिश्चिततेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी देऊर येथील शिरीष देवरे यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Farmer Success Story
Farmer Success Story
धुळे : पारंपरिक पिकांतील अनिश्चिततेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी देऊर येथील शिरीष देवरे यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कपाशीला पर्याय म्हणून त्यांनी टरबूज पिकाची निवड केली आणि अवघ्या ६५ दिवसांत भरघोस उत्पन्न मिळवत यशस्वी प्रयोग साकारला आहे. त्यांच्या शेतातील दर्जेदार टरबूजांना आता राज्याबाहेरही मोठी मागणी निर्माण झाली असून, गुजरातमधील अहमदाबादसह विविध बाजारपेठांमध्ये त्यांची विक्री होत आहे.
पाच एकरात आधुनिक पद्धतीने लागवड
देवरे यांनी रब्बी हंगामात पाच एकर क्षेत्रावर टरबूज लागवड केली. ६ बाय ४ अंतरावर बेड तयार करून मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करण्यात आला. पारंपरिक बियाण्यांऐवजी रोप लागवड पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पिकाची वाढ अधिक जोमदार झाली आणि उत्पादन खर्चातही बचत झाली.
१०० टनांची विक्रमी पहिली तोडणी
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे सध्या बाजारात टरबूजाला मोठी मागणी आहे. देवरे यांच्या शेतातील टरबूजांचे वजन साधारण ४ ते ६ किलोपर्यंत आहे. पहिल्याच तोडणीत सुमारे १०० टन उत्पादन मिळाले असून, व्यापाऱ्यांनी प्रति किलो ८ रुपये दराने खरेदी केली. गुजरातसह दिल्ली आणि राजस्थानमध्येही मागणी वाढल्याने या पिकाला चांगली बाजारपेठ मिळाली आहे.
advertisement
दोन महिन्यांत लाखोंचे उत्पन्न
कापूस आणि मका यांसारख्या पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना, देवरे यांनी योग्य नियोजन, वेळेवर फवारणी आणि व्यवस्थापनाच्या जोरावर अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. सर्व खर्च वजा जाता त्यांना जवळपास ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
“टरबूज लागवड सोपी नाही, त्यासाठी सातत्याने लक्ष द्यावे लागते. वेळेवर फवारणी आणि व्यवस्थापन खर्चिक असले तरी योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते,” असे शिरीष देवरे यांनी सांगितले. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
याला म्हणतात स्मार्ट शेती! धुळ्याच्या शिरीषने टायमिंग साधला, या पिकातून फक्त ६५ दिवसांत कमवले ८ लाख रुपये
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement