बॉलिवूडचा असली 'धुरंधर'! ज्याच्या एंट्रीने हादरलं होतं खान्सचं सिंहासन; 3 फिल्सचा वर्षभर धुमाकूळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
तो काळ जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत खान्सच्या सिंहासनाला आव्हान जेणं अशक्य समजलं जात होतं. तेव्हा या नव्या अभिनेत्याने अशक्यही शक्य करून दाखवलं. एकाच वर्षात त्याने तीन ब्लॉकबस्टर फिल्म्स दिल्या.
2000 वर्ष... हा तो काळ होता जेव्हा शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तीन खान बॉलिवूडवर राज्य करत होते. या त्रिकुटाला तोडणं अशक्य आहे, असा विश्वास प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा विश्वास होता. पण मग एक तरुण मोठ्या पडद्यावर आला, ज्याने आपल्या पहिल्याच चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसचं समीकरणच बदललं नाही, तर रातोरात अशी लाट निर्माण केली की खान्सचं सिंहासनही हादरलं.
advertisement
त्याची पहिलीच फिल्म्स 2000 सालचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या एकाच वर्षात त्याने अशा 3 फिल्म्स केल्या, ज्या त्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 फिल्म्समध्ये गणल्या गेल्या. एकाच वर्षात टॉप-10 मध्ये तीन चित्रपट देणं हे कोणत्याही नवीन अभिनेत्यासाठी एक स्वप्न होतं. या चित्रपटाने शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'मोहब्बतें'लाही मागे टाकलं.
advertisement
advertisement
हा अभिनेता आहे हृतिक रोशन, ज्याला 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखलं जातं. त्याची 2000 साली आलेली पहिलीच कहो ना... प्यार है ही फिल्म जी इतकी हिट ठरली की या चित्रपटाने हृतिकला रातोरात सुपरस्टार बनवलं. या फिल्ममधील कहो ना प्यार है आणि एक पल का जीन गाण्याच्या सिग्नेचर स्टेपने संपूर्ण देशाला थिरकायला लावलं. यात हृतिकची दुहेरी भूमिका, त्याची शरीरयष्टी आणि त्याचा अभिनय यांनी खान्सच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिलं.
advertisement
'कहो ना... प्यार है'च्या प्रचंड यशानंतर हृतिकने सिद्ध केलं की तो केवळ एक 'चॉकलेट बॉय' नाही. 'मिशन काश्मीर'मध्ये हृतिकने अल्ताफ नावाच्या दहशतवाद्याची भूमिका साकारली होती, जो आपल्या भूतकाळ आणि वर्तमानकाळात संघर्ष करत असतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कामगिरी केली आणि 2000 सालचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आणि सलमानच्या 'दुल्हन हम ले जाएंगे' आणि 'हर दिल जो प्यार करेगा' या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली.
advertisement
त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये हृतिक 'फिझा' या चित्रपटात दिसला. त्या काळातील स्टार्स मसाला फिल्म्सच्या मागे धावत असताना हृतिकने एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील चित्रपट निवडला. या चित्रपटात त्याने करिश्मा कपूरचा भाऊ अमनची भूमिका साकारली, जो दंगलींनंतर भरकटतो. प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा असूनही, 'फिझा' 2000 सालचा आठवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
advertisement








