advertisement

पुण्यात भयानक प्रकार! गाडी हटवण्यास सांगितल्याचा राग; मालकाने 3 'जर्मन शेफर्ड' कुत्री अंगावर सोडली, तरुणासोबत भयंकर घडलं

Last Updated:

आपल्या जागेसमोर लावलेली गाडी बाजूला घेण्याची विनंती केल्याच्या राग एका व्यक्तीला चांगलाच अनावर झाला. यानंतर या व्यक्तीने चक्क आपली ३ जर्मन शेफर्ड कुत्री बाप-लेकाच्या अंगावर सोडली

मालकाने आपली ३ जर्मन शेफर्ड कुत्री बाप-लेकाच्या अंगावर सोडली (प्रतिकात्मक फोटो)
मालकाने आपली ३ जर्मन शेफर्ड कुत्री बाप-लेकाच्या अंगावर सोडली (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: शहरात पाळीव प्राण्यांवरून होणाऱ्या टोकाच्या वादाच्या घटना ताज्या असतानाच, आता आणखी एक अजब आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात वानवडी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या जागेसमोर लावलेली गाडी बाजूला घेण्याची विनंती केल्याच्या राग एका व्यक्तीला चांगलाच अनावर झाला. यानंतर या व्यक्तीने चक्क आपली ३ जर्मन शेफर्ड कुत्री बाप-लेकाच्या अंगावर सोडली. या हल्ल्यात तरुणाच्या पायाचा कुत्र्याने गंभीर चावा घेतला असून, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण काय?
राजेंद्र एकनाथ जांभूळकर (वय ६५, रा. वानवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जांभूळकर यांच्या आझादनगरमधील जागेत बांधकामासाठी विटांचा ट्रक आला होता. मात्र, शेजारी राहणारे जॉन गेगरी फर्नांडिस (वय ५७) यांनी आपल्या गाड्या जांभूळकर यांच्या गेटसमोर पार्क केल्या होत्या. त्यामुळे ट्रक आत नेता येत नव्हता. जेव्हा जांभूळकर यांनी गाड्या हटवण्याची विनंती केली, तेव्हा फर्नांडिस यांनी केवळ नकारच दिला नाही, तर वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
जांभूळकर आणि त्यांचा मुलगा रोहन स्वतःहून गाड्या बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी फर्नांडिस यांनी रागाच्या भरात आपली ३ पाळीव जर्मन शेफर्ड कुत्री त्यांच्या अंगावर सोडून दिली. यातील एका कुत्र्याने रोहन यांच्या डाव्या पायाच्या पोटरीचा जोरात चावा घेतल्याने मोठा रक्तस्राव झाला. एवढ्यावरच न थांबता, फर्नांडिस यांनी हातातील वस्तूने दोघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
advertisement
वानवडी पोलिसांनी याप्रकरणी जॉन फर्नांडिस याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार क्षीरसागर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात भयानक प्रकार! गाडी हटवण्यास सांगितल्याचा राग; मालकाने 3 'जर्मन शेफर्ड' कुत्री अंगावर सोडली, तरुणासोबत भयंकर घडलं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement