खिशात 1200 रुपये, घर सोडून मुंबईत आला अभिनेता; लोकांना हसवून बनला 300 कोटींच्या संपत्तीचा मालक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड अभिनेता खिशात 1200 रुपये घेऊन घर सोडून मुंबईत आला. खूप स्ट्रगल केला आज लोकांना हसवून तो 300 कोटींच्या संपत्तीचा मालक बनला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कपिल हे कॉमेडी इंडस्ट्रीमधील एक असे नाव आहे, ज्याची लोकप्रियता आणि स्टारडम अनेक मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा खूप जास्त आहे. परंतु इथपर्यंतचा त्याचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कपिलच्या खांद्यावर आली. सुरुवातीला एका कॉमेडी शोच्या ऑडिशनमधून त्याला नाकारण्यात आलं.
advertisement
कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्याचे वडील, जितेंद्र कुमार, हेड कॉन्स्टेबल होते आणि त्याची आई, जानकी राणी, गृहिणी आहेत. कपिलला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण देखील आहे. कपिल लहानपणापासूनच खूप खोडकर आणि खेळकर होता. त्याला टीव्हीवरील कलाकारांची नक्कल करायला आवडायचे. लहानपणापासूनच तो आपल्या खोड्यांनी लोकांना हसवायचा पण तेव्हा कोणालाच माहीत नव्हते की एक दिवस तो आपल्या विनोदाने जगावर राज्य करेल.
advertisement
advertisement
लहान वयातच कामाला सुरुवात कपिलने लहान वयातच कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तो एका पीसीओ बूथवर काम करायचा. त्याला 500 रुपये पगार मिळायचा. दहावी पूर्ण केल्यानंतर तो एका कापड गिरणीत काम करू लागला. जिथे तो महिन्याला 900 रुपये मिळायचे. सुट्टीत कपिल कामाच्या शोधात 1200 रुपये घेऊन मुंबईला गेला पण रिकाम्या हाताने अमृतसरला परतला.
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिलची एकूण संपत्ती सुमारे 330 कोटी रुपये आहे. त्याच्या मालकीच्या आलिशान गाड्यांमध्ये 1.25 कोटी रुपये किमतीची व्होल्वो एक्ससी 90 आणि 1.20 कोटी रुपये किमतीची मर्सिडीज-बेंझ एस 350 सीडीआय यांचा समावेश आहे. तो दरवर्षी 15 कोटी रुपये आयकर भरतो. पंजाबमध्ये त्याच्या मालकीचे 25 कोटी रुपये किमतीचे एक आलिशान फार्महाऊस आहे. तो मुंबईत ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.







