advertisement

'होय, मी कासीम सुलेमानीचा खात्मा केला', ट्रम्प यांची जाहीर कबुली, अमेरिकेला होता सगळ्यात मोठा धोका

Last Updated:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इराणमध्ये सैन्य उतरण्याच्या धमक्या देत आहेत. आज त्यांनी अमेरिकन जनतेला संबोधित केलं आहे. यात त्यांनी आपण इराणविरुद्धचं युद्ध जिंकत असल्याचा दावा केला आहे.

Qasem Soleimani
Qasem Soleimani
यात त्यांनी आपण इराणविरुद्धचं युद्ध जिंकत असल्याचा दावा केला आहे. शिवाय आपण इराणच्या अनेक टॉप लीडर्सला संपवलं आहे. इराणकडील शस्त्रसाठा संपत आहे. त्यांची लढा देण्याची क्षमता संपत चालली आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला. याशिवाय आपल्या पहिल्या कार्यकाळात 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) मधील 'कुड्स फोर्स' (Quds Force) या विशेष विभागाचे कमांडर कासीम सुलेमानीचा खात्मा केला, अशी कबुली ट्रम्प यांनी दिली.
advertisement
अमेरिकेला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, माझ्या पहिल्या कार्यकाळात मी सुलेमानीचा खात्मा केला. तो एक अत्यंत कर्तृत्ववान व्यक्ती होता. पण माणूस म्हणून मात्र तो अतिशय वाईट होता. त्यामुळे मी त्याला मारलं. मी इराणला कधीही अणु-कवच प्राप्त करू देणार नाही. यापूर्वी आपल्या कोणत्याही मागील राष्ट्राध्यक्षांनीही तसं होऊ दिलं नव्हतं. ही परिस्थिती खूप आधीच हाताळली जायला हवी होती.
advertisement
ओबामांनी इराणसोबत केलेला तो विनाशकारी अणु-करार मी संपुष्टात आणला. ते आमच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवत असत. त्यांचा तो इराण करार म्हणजे एक प्रचंड अपयश ठरलं असतं. तो एक अत्यंत वाईट करार होता. त्यांनी चुका केल्या, आणि आता मी त्या सुधारत आहे, असंही ट्रम्प म्हणाले.

कासिम सुलेमानी कोण होता?

कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) हे इराणच्या लष्करी आणि राजकीय इतिहासातील अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व होते. ते इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) मधील 'कुड्स फोर्स' (Quds Force) या विशेष विभागाचे कमांडर होते. हा विभाग प्रामुख्याने इराणच्या बाहेर गुप्त मोहिमा, लष्करी प्रशिक्षण आणि परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम करतो. त्यांना अनेकदा 'शॅडो कमांडर' म्हटले जात असे. कारण ते थेट समोर न येता मध्यपूर्वेतील अनेक देशांच्या राजकारणात आणि लष्करी हालचालींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर त्यांना इराणमधील दुसरी सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जात असे. इराणमध्ये त्यांना एक राष्ट्रीय नायक मानलं जात होतं.
advertisement

सुलेमानी यांना कसं मारलं?

इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ३ जानेवारी २०२० रोजी अमेरिकेने एका एअर स्ट्राईकद्वारे संपवलं होतं. हा हल्ला इराकची राजधानी बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर करण्यात आला. सुलेमानी नुकतेच विमानाने बगदादमध्ये पोहोचले होते आणि त्यांच्या ताफ्यातील गाड्या विमानतळावरून बाहेर पडत असताना हा हल्ला झाला.
अमेरिकेने सुलेमानी यांना मारण्यासाठी MQ-9 Reaper या अत्यंत आधुनिक आणि घातक ड्रोनचा वापर केला होता. या ड्रोनमधून 'हेलफायर' (Hellfire) क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, ज्यांनी सुलेमानी यांच्या गाडीचा अचूक वेध घेतला. या हल्ल्यात केवळ कासिम सुलेमानीच नाही, तर इराकच्या 'हशद अल-शाबी' या लष्करी गटाचा उपप्रमुख अबू महदी अल-मुहंदिस हादेखील मारला गेला. त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही अधिकाऱ्यांचाही यात मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
'होय, मी कासीम सुलेमानीचा खात्मा केला', ट्रम्प यांची जाहीर कबुली, अमेरिकेला होता सगळ्यात मोठा धोका
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement