Iran Hormuz : ''आमच्याकडे पुरेसा तेलसाठा, इतर देशांनी... '','होर्मुझ'वरून ट्रम्प यांनी हात झटकले, जगाचं टेन्शन वाढलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Donald Trump On Hormuz : इराणविरोधात युद्ध पुकारणाऱ्या अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत आता हात झटकले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या पत्रकार परिषदेत संकेत दिलेत.
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू करून महिना उलटला आहे. मात्र, हा संघर्ष आणखीच तीव्र होत आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणे अमेरिका-इस्रायलवर जोरदार पलटवार केला. त्याशिवाय, इराणने आपल्या नियंत्रणातील होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतूक बंद केली. याच्या परिणामी जगभरातील तेल, गॅस पुरवठा खंडित झाला. इराणविरोधात युद्ध पुकारणाऱ्या अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत आता हात झटकले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या पत्रकार परिषदेत संकेत दिलेत. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची भीती आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'होर्मुझ सामुद्रधुनी' पुन्हा खुली करण्याबाबत कोणतीही मोठी घोषणा करण्याचे टाळले आहे. याउलट, या कोंडीचा फटका बसत असलेल्या राष्ट्रांना त्यांनी केवळ संयम राखण्याचा किंवा पर्यायी मार्ग स्वीकारण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. सामुद्रधुनीतील तणावावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, संबंधित राष्ट्रांनी हा संघर्ष संपेपर्यंत प्रतीक्षा करावी. हा संघर्ष थांबल्यानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी नैसर्गिकरित्या पुन्हा खुली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
आमच्याकडे पुरेसा तेलसाठा, इतर देशांनी....., ट्रम्प यांचा अजब पर्याय
होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने भारतासह अनेक देशांचा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर अजब पर्याय सांगितला. अमेरिकेकडे तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे असल्याचे सांगत, ट्रम्प यांनी बाधित देशांना अमेरिकेकडून इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले. आमच्याकडे इंधनाचा मोठा साठा आहे, त्यामुळे आमच्याकडून खरेदी करणे हाच सुरक्षित पर्याय आहे," असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. आमच्याकडून तेल खरेदी करायचे नसल्यास, स्वतः त्या देशांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी जवळ जाऊन आपली अडकलेली जहाजे परत घेऊन यावी असे म्हटले.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, मागच्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. जगानं असं युद्ध कधीही पाहिलं नसेल. इराणची ड्रोन क्षमता आणि क्षेपणास्राची क्षमता संपली आहे. जगानं असा विजय कधीही पाहिला नसेल. इराणला कधीही अण्वस्त्र तयार करण्याची परवानगी देणार नाही. इराणवर नियंत्रण मिळवण्यात आम्हाला यश मिळालं आहे. इराणचं संपूर्ण नौदल आम्ही संपवलं असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
advertisement
इराणचे सगळे बडे नेते अमेरिकेनं ठार केले आहेत. इराणला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आम्ही कधीच तयार करू देणार नाही. युद्धाच्या इतिहासात आजवर असं कधीच झालं नाही. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हे ऑपरेशन गरजेचं होतं. आम्ही सलग मोठा विजय मिळवला असल्याचे त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी म्हटले की, आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यावर अमेरिका कायम आहे. काही देशांनी आमची साथ या युद्धात दिली नाही. आमच्याकडे तेलाची आणि गॅसची कमतरता नाही. तेल आणि गॅस उत्पादनात आम्ही जगात पहिल्या स्थानावर आहोत हे विसरू नये. जुन्या काही चुका सुधारायची वेळ आलीय. युद्ध संपल्यानंतर हार्मुज पुन्हा सुरू होईल.ऑपरेशन एपिक फ्यूरी चालू राहणार आहे. संपूर्ण जग पाहत आहे. अमेरिका सर्वात सुरक्षित आणि आर्थिक दृष्ट्या अधिक मजबूत होत आहे. इराणसोबत आम्ही कोणताही करार करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Apr 02, 2026 7:25 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Iran Hormuz : ''आमच्याकडे पुरेसा तेलसाठा, इतर देशांनी... '','होर्मुझ'वरून ट्रम्प यांनी हात झटकले, जगाचं टेन्शन वाढलं







