'या' आहेत देशातील सर्वात सुरक्षित SUV! क्रॅश टेस्टमध्ये मिळालीये 5-स्टार रेटिंग, लिस्ट पाहाच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कोणतीही व्यक्ती कार खरेदी करताना तिचे फीचर्स पाहते. यामधील सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे सेफ्टी फीचर्स असतात. कार कुटुंबासाठी सुरक्षित असेल तर तिला प्राधान्य दिलं जातं. आज आपण देशातील 10 सर्वात सुरक्षित एसयूव्हीविषयी जाणून घेणार आहोत.
Mahindra Scorpio N: महिंद्राच्या या 'बिग डॅडी' SUV ने सिद्ध केलंय की, ही एक मोठी रग्ड गाडीही एवढी सुरक्षित असू शकते. ग्लोबल NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळवून या गाडीने आता जुन्या स्कॉर्पियोची इमेज पूर्णपणे बदललीये. याचे टायर आणि हाय ग्राउंड क्लीयरेन्स या कारला खडबडीत रस्त्यांवर सुरक्षित ठेवते. तसं याचं इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) वेगवान वळणावर पलटी होण्यापासून वाचवते.
advertisement
Mahindra XUV700: महिंद्राच्या या एसयूव्हीने आपल्या भारी मजबुती आणि मॉडर्न सेफ्टी टेक्नॉलॉजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या कारला ग्लोबल NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे आणि ही सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ऑटोनॉमस इमर्जेंसी ब्रेकिंगसारखे ADAS फीचर्ससह येते. या कारची बॉडी स्ट्रक्चर खुप मजबूत आहे. जी सुपरफास्ट स्पीडवरही प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
advertisement
Tata Safari/Harrier: टाटाची ही फ्लॅगशिप एसयूव्ही सेफ्टीच्या बाबतीत भारतीय बाजाराची बेंचमार्क मानली जाते. लँड रोव्हरच्या ओमेगा-आर्क प्लॅटफॉर्मवर तयार या कारने भारत NCAP आणि ग्लोबल NCAP दोन्हीमध्ये वयस्कर आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 5-स्टार रेटिंग मिळवली आहे. यात 7 एयरबॅग्स, लेव्हल-2 ADAS आणि स्टेबिलिटी कंट्रोल सारखे अडव्हान्स फीचर्स मिळतात. ज्यामुळी ती दणकट ठरते.
advertisement
Tata Nexon: ही देशातील पहिली कार होती. जिने ग्लोब NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळवून इतिहास रचला होता. या कारच्या नव्या अवतारात सेफ्टीही आणखी मजबूत केलीये. आता या कारमध्ये 6 एयरबॅग स्टँडर्स म्हणून मिळतात. या कारचं मजबूत स्ट्रक्चर आणि स्टेबिलिटी कंट्रोल प्रोग्राम खराब रस्ते आणि अचानक आलेले वळण गाडीला संतुलित ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे कुटुंब सुरक्षित राहतं.
advertisement
Volkswagen Taigun/Skoda Kushaq: जर्मन इंजीनियरिंगचे हे दोन्ही सिब्लिंग आपल्या कॅटेगिरीमध्ये सर्वात सुरक्षित मानल्या जातात. यांना ग्लोबल NCAP च्या कठोर आणि नवीन नियमांअंतर्गत 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. याचं वजन संतुलित आहे आणि यात मल्टी-कोलिजन ब्रेकिंगसारखे फीचर्स मिळतात. जे दुर्घटनेच्या वेळी टक्कर रोखण्यास मदत करते.ड्रायव्हिंगची आवड असणाऱ्यांसाठी सेफ्टी आणि परफॉर्मेंसचं हे भारी मिश्रण आहे.
advertisement
2026 Kia Seltos: किआ सेल्टोसच्या नवीन मॉडलने भारत NCAP क्रेश टेस्टमध्ये शानदार प्रदर्शन करत 5-स्टार रेटिंग मिळवली आहे. कंपनीने याच्या बॉडी शेलला पहिल्यापेक्षा जास्त मजबूत केलंय. आता यात 6 एयरबॅग्स आणि डिस्क ब्रेक्स सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड मिळतात. यासोबतच या कारचे लेव्हल-2 ADAS सिस्टम रस्त्यांवर पायी चालणाऱ्यांसाठी आणि समोर येणाऱ्या गाड्यांना टक्कर घेण्याचा धोका खुप कमी करते.
advertisement
Tata Punch: या कारची किंमत कमी आहे. तरीही टाका पंचने सुरक्षेच्या बाबतीत मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकलंय. ज्येष्ठ नारगिकांच्या सुरक्षेसाठी या कारला ग्लोब NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. ज्यामुळे ती भारतातील सर्वात सुरक्षित मायक्रो एसयूव्ही बनते. याचं 'अल्फा' प्लॅटफॉर्म दुघर्टनेच्या वेळी प्रभाव प्रवाशांपर्यंत पोहोचू देत नाही. लहान कुटुंब आणि शहरात चालवण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
Tata Curvv/Curvv EV: टाटाच्या या नव्या कूपे-स्टाइल एसयूव्हीने बाजारातयेताच सेफ्टीच्या बाबतीत 5-स्टार रेटिंग आपल्या नावे केलीये. मग त्याचं इलेक्ट्रिक व्हर्जन असो किंवा पेट्रोल-डिझेल, टाटाने याच्या मजबुतीसह कोणताही समझोता केलेला नाही. यात अडव्हान्स ई-कॉल आणि बी-कॉल सारखे फीचर्स मिळतात. ज्यामुळे कोणत्याही दुर्घटनेच्या स्थितीत लगेच आपत्कालिन सहाय्यता टीमला अलर्ट पाठवतात.
advertisement
Maruti Suzuki Victoris/e-Vitara: मारुती सुझुकीने आपली नवीन जनरेशनच्या गाड्यांमध्ये सेफ्टी मजबूत केलीये. विक्टोरिस आणि ई-विटारासारख्या मॉडल्सने भारत NCAP टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवली आहे. या कारमध्ये हाय-स्ट्रेंथ स्टीलचा वापर करण्यात आला आणि सेफ्टीसाठी यात 6 एयरबॅगसह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स स्टँडर्ड दिलेय.








