advertisement

भक्ताला हनुमानाने दिला तो आशिर्वाद अन् 400 वर्षांपूर्वी स्थापन झालं 'सुपारी मंदिर', आख्यायिका माहितीये का?

Last Updated:

हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी मोठा उत्सव असतो, त्यासोबत अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. या मंदिराचा नेमका इतिहास काय याबद्दलच विश्वस्त सदस्य राहुल पुजारी यांनी माहिती दिली आहे. 

+
हनुमानाने‎ title=हनुमानाने सुपारी रूपात दर्शन दिल म्हणून स्थापन झाला सुपारी हनुमान मंदिर
‎ />

हनुमानाने सुपारी रूपात दर्शन दिल म्हणून स्थापन झाला सुपारी हनुमान मंदिर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर ऐतिहासिक शहर आहे. शहराच्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्यासोबत अनेक असे ऐतिहासिक मंदिरे आहेत. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भाग म्हणजे औरंगपुरा आणि गुलमंडी परिसरात असलेले सुपारी हनुमान मंदिर. अत्यंत प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे आणि शहराचे ग्रामदैवत देखील हे मंदिर आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी मोठा उत्सव असतो, त्यासोबत अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. या मंदिराचा नेमका इतिहास काय याबद्दलच विश्वस्त सदस्य राहुल पुजारी यांनी माहिती दिली आहे.
‎जुन्या शहरात सुपारी मारुती प्रसिद्ध असलेले देवस्थान मानले जाते. सुमारे 400 ते 500 वर्षांपासूनचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. प्राचीन माहितीनुसार जुन्या काळी आशीर्वाद स्वरूपात सुपारी मिळायची. याच ठिकाणी एका भक्ताला हनुमानाने दर्शन स्वरूपात सुपारी दिली होती. त्या ठिकाणी ही सुपारी ठेवून मंदिराची स्थापना करण्यात आली होती.
बालरूपातील हनुमान या ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त मुखवटा असून, डोळे आणि हसरा चेहरा अशी मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. 1792 साली मंदिराच्या झालेल्या बैठकीचे पुरावे आजही असून, मंदिराला विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळेच रोज हजारो भक्त दर्शनासाठी मंदिर परिसरात येतात, अशी माहिती विश्वस्त सदस्य राहुल पुजारी यांनी सांगितली.
advertisement
‎जुन्या काळी असलेले मंदिर कालांतराने जीर्ण झाले आणि त्यानंतर 1998 मध्ये मंदिराची 1998 ते 2001 या काळात बांधणी नव्याने करण्यात आली. दाक्षिणात्य पद्धतीची मंदिर रचना उभी केल्याने आकर्षक रूप प्राप्त झाले. मंदिराच्या कळसावर मारुतीच्या 30 वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. यामध्ये लक्ष्मण आजारी असताना त्यासाठी संजीवनी जडीबुटी घेऊन जाताना मारुती, अशा अनेक वेगवेगळ्या रूपांत मारुतीचे दर्शन मंदिराच्या बाहेरून घेता येते. इतकेच नाही तर मंदिराच्या मागच्या बाजूने शिव-शंकर-पार्वतीची मूर्ती आणि समोर गणपती पाहायला मिळतो. रुद्रावतार दर्शवण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे राहुल पुजारी आणि यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
भक्ताला हनुमानाने दिला तो आशिर्वाद अन् 400 वर्षांपूर्वी स्थापन झालं 'सुपारी मंदिर', आख्यायिका माहितीये का?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement