Ramayana Teaser : बहुप्रतिक्षित 'रामायण'चा टीझर रिलीज, रामाच्या रुपात रणवीरची पहिली झलक समोर, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरचा रामायण टीझर हनुमान जयंतीला रिलीज करण्यात आला आहे. रामाच्या भूमिकेत रणबीरचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
नितेश तिवारी आणि रणबीर कपूर यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसतोय. गेल्या अनेक दिवसांपासून रणवीरला रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर होते. अखेरत त्याला पहिला लूक समोर आला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी रामायण सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे.
2 मिनिटे 38 सेकंदांचा हा टीझर खूपच आकर्षक आहे. रामाच्या रूपात असलेल्या रणवीरचं सौम्य, शांत आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व दिसत आहे. एकही डायलॉग नाही फक्त म्युझिकवर टीझर पाहायला मिळतोय. पार्श्वसंगीत प्रभावी आहे. सीन्स आणि व्हीएफएक्स तुमच्या डोळ्यांना आणि कानांना थेट तुमच्या हृदयात भिडतात.
( Riteish-Genelia Deshmukh : रितेश-जेनिलिया पुन्हा लावणार 'वेड'! या दिवशी नवीन फिल्म, पहिला लुक समोर )
advertisement
रामाची भूमिका साकारणारा रणबीर शांत आणि संयमी दिसतो. बदलत्या परिस्थितीत त्याची आक्रमक आणि धाडसी बाजूही दिसून येते. टीझरमध्ये लक्ष्मण आणि सीता यांची पात्रे अस्पष्ट असून संपूर्ण लक्ष रामावर केंद्रित करण्यात आलं आहे. टीझरच्या शेवटी रावणाची एक झलक दाखववण्यात आली आहे पण त्याचा चेहरा दाखवलेला नाही. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पसंती दिली आहे.
advertisement
'रामायण'चा टीझर प्रदर्शित झाल्यावर दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, "'रामायण'चे मोठेपण त्याच्या भावनिक खोलीत आहे. हे केवळ चांगल्या आणि वाईटाच्या लढाईबद्दल नाही तर आपले निर्णय, त्यांचे परिणाम आणि योग्य गोष्ट करण्याची आपली जबाबदारी याबद्दल आहे. रामाचा प्रवास अत्यंत मानवी आहे आणि आम्ही तो प्रामाणिकपणे चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे."
advertisement
प्रभू रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला, "मला वाटत नाही की मी रामाची भूमिका साकारण्यासाठी आलो आहे. मी त्यांच्याकडून शिकण्यासाठी आलो आहे. त्यांच्यामध्ये एक साधेपणा आणि पवित्रता आहे जी क्वचितच पाहायला मिळते आणि ती समजून घेण्याचा आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे हा माझ्यासाठी एक अत्यंत नम्र करणारा अनुभव आहे."
'रामायण' टीझर टीझर रिव्हू्यू समीक्षक तरण आदर्श यांनी लिहिलं आहे, "जय श्री राम... मी नुकतीच बहुप्रतिक्षित महाकाव्य 'रामायण' रामाची नवीन झलक पाहिली आणि मी मंत्रमुग्ध झालो आहे. हे खरोखरच नेत्रदीपक आहे यात शंका नाही. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही झलक लोकांच्या उच्च अपेक्षांवर पूर्णपणे खरी उतरते. प्रभू रामाची भूमिका साकारणारा रणबीर कपूर अत्यंत आकर्षक दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर शांती, देवत्व आणि शक्ती स्पष्टपणे दिसून येत आहे. अप्रतिम सीन्स, उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि दमदार पार्श्वसंगीत (हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान) 'रामायण'ची ही झलक खरोखरच नेत्रदीपक आहे."
advertisement
तरण आदर्श यांनी पुढे लिहिले, "मी आधी म्हटल्याप्रमाणे, 'रामायण' केवळ आजच्या काळासाठी नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. या भव्य प्रोजेक्टला पाठिंबा देणारे दूरदर्शी निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी हे महाकाव्य पूर्ण प्रामाणिकपणाने आणि भव्यतेने मोठ्या पडद्यावर आणत आहेत." 'रामायण' या दिवाळीत प्रदर्शित होईल.
Location :
Minalur,Thrissur,Kerala
First Published :
Apr 02, 2026 12:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ramayana Teaser : बहुप्रतिक्षित 'रामायण'चा टीझर रिलीज, रामाच्या रुपात रणवीरची पहिली झलक समोर, VIDEO









