advertisement

Sharad Pawar: पटेल-तटकरे राष्ट्रवादी हायजॅक करत होते? शरद पवारांनी एका वाक्यात प्रकरण काढलं निकाली!

Last Updated:

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कोणतेही पदं देण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत राजकीय वाद पेटला होता

News18
News18
नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत पेटलेला वाद चव्हाट्यावर आला होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कोणतेही पदं देण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत राजकीय वाद पेटला होता. "राष्ट्रवादी अजित पवार गट हा त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निष्कर्ष काढला हे त्यांनी पाहिलं पाहिजे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल त्यांच्या सहकारी काय निर्णय घेतात, कुणावर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे' अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी पक्ष हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हायजॅक करत होते, असे आरोप झाले, याबद्दल विचारले असता शरद पवारांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली.
"राष्ट्रवादी अजित पवार गट हा त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निष्कर्ष काढला हे त्यांनी पाहिलं पाहिजे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल त्यांच्या सहकारी काय निर्णय घेतात, कुणावर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी आमच्या पक्षामध्ये विलनीकरणांची चर्चा झाली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली होती. अजित पवारांबद्दल सर्वांना आदर होता' असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
advertisement
सुनेत्रा पवारांना आमचा पाठिंबा
"उमेदवार देणं हा त्या पक्षाचा विषय आहे. काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे, तो त्यांचा अधिकार आहे,  त्यावर फार चर्चा करण्याची गरज नाही. बिनविरोध करा अस म्हणायचं पण काही कारण नाही. लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मागच्या निवडणुकीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा अशी झाली होती,  तेंव्हा सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. सुप्रिया यांची चौथी निवडणूक होतीकाँग्रेसला बोलण्याची काय गरज आहे,  राजकारणात येणारी लोक लोकांची काम करण्यासाठी येतात, अजित पवार लोकांची काम करत होते. त्यांचा आदर आहे, हे मान्य केलं आहे ते जाण्याचं दुःख कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांना आहे. कुटुंबात एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख त्याची बाकीची भूमिका मांडली जाते, ती राजकीय नसते. आज ती जबाबदारी माझी होती. त्यामुळे आम्ही ठरवलं आपल्याकडून उमेदवारी द्यायची नाही. आता समोर कुणीतरी लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत उभं राहावं लागतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
advertisement
राष्ट्रवादी पत्रावरून काय वाद? 
राष्ट्रवादी पक्षात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पद असलेलं पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. या पत्रात केवळ सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे पद आहे. बाकीच्या नेत्यांच्या नावांपुढे नाही. याचा खुलासा जरी पार्थ पवार यांनी केला असला तरी या पत्राची तारीख महत्त्वाची आहे जी २६ फेब्रुवारी २०२६ . निवडणूक आयोगाला एक पत्र राष्ट्रवादीने १० मार्च २०२६ रोजी लिहिलं होतं. एक पत्र १६ फेब्रुवारीला लिहिले होतं. या सगळ्या पत्रांमुळे घोळात घोळ झाला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: पटेल-तटकरे राष्ट्रवादी हायजॅक करत होते? शरद पवारांनी एका वाक्यात प्रकरण काढलं निकाली!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement