advertisement

Railway News: खुशखबर! पश्चिम रेल्वेवर धावणार 15 डब्यांची लोकल, नवीन ट्रॅक आणि वाढीव गाड्यांमुळे प्रवास होणार सोप्पा

Last Updated:

पश्चिम रेल्वेच्या विरार- डहाणू आणि चर्चगेट- विरार या मार्गावर पंधरा डब्याच्या लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेकडून त्या दृष्टीने संपूर्ण तयारी केली असून नुकताच ट्रायल रन सुद्धा पूर्ण झाली आहे. या नव्या कामामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

News18
News18
मुंबई: विरार- डहाणूकरांचा प्रवास आता आणखीनच गर्दीमुक्त आणि सुसाट होणार आहे. कारण आता लवकरच पश्चिम रेल्वेवर विरार- डहाणू आणि चर्चगेट- विरार मार्गावर 15 डब्यांच्या लोकलच्या 17 लोकल फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची अखेर गर्दीतून कायमची मुक्तता होणार आहे. 15 डब्ब्यांच्या लोकल चेन्नईच्या कारखान्यातून मुंबईमध्ये दाखल झाल्या असून लवकरच त्या प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. या 15 डब्ब्यांच्या लोकलचा विरार- डहाणू मार्गावर 17 लोकल फेऱ्या होणार आहेत. यामुळे सहाजिकच विरार- डहाणूकरांचा प्रवास आणखीनच जलद होणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डब्ब्यांच्या लोकल लवकरच 15 डब्ब्यांमध्ये शिफ्ट केल्या जाणार आहे. सर्वाधिक गर्दी असणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना याचा फार फायदा होणार आहे. प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या या मार्गावर गर्दी कमी करण्याचा मानस रेल्वेचा आहे. शिवाय, प्रवाशांचा प्रवास गर्दीच्या वेळी अधिकच सुरळीत होईल. विरार-डहाणू मार्गावर पहिल्यांदाच 15 डब्यांची लोकल सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनेक 12 डब्ब्यांच्या लोकल 15 डब्ब्यांमध्ये शिफ्ट करणार आहेत. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
advertisement
विरार- डहाणू मार्गावर 15 डब्ब्यांच्या आठ लोकल धावणार आहेत. तर चर्चगेट- विरार मार्गावर 15 डब्ब्यांच्या नऊ लोकल धावणार आहेत. हे दोन्हीही मार्ग उपनगरातील सर्वाधिक गर्दीच्या भागांपैकी एक आहे आणि या निर्णयामुळे कार्यालयीन वेळेमध्ये प्रवाशांची गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. एकूण 17 लोकल सेवा सुरू केल्या जाणार असून हा उपक्रम पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे क्षमता वाढवण्याच्या आणि अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विरार- डहाणू मार्गावर काल (रविवार- 5 एप्रिल) 15 डब्ब्यांच्या लोकलची ट्रायल रन घेण्यात आली.
advertisement
15 डब्ब्यांच्या लोकलसाठी उभारलेल्या स्थानकांची लांबी आणि रूंदी वाढवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतरच ही ट्रायल रन घेण्यात आली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून रेल्वे स्टेशनच्या लांबी आणि रूंदी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते लवकरच पश्चिम रेल्वेच्या हाती सुपूर्द केले जाणार आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकलची प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Railway News: खुशखबर! पश्चिम रेल्वेवर धावणार 15 डब्यांची लोकल, नवीन ट्रॅक आणि वाढीव गाड्यांमुळे प्रवास होणार सोप्पा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement