Realme 16 5g फोनचा सेल आजपासून सुरू! मिळते 7000mAh बॅटरी, पण किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
रियलमीचे एकापेक्षा एक फोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आजपासून Realme 16 5G फोनचीही भारतात विक्री सुरू झालीये. चला पाहूया या फोनमध्ये काय खास आहे.
भारतात रियलमीचे फोन मोठ्या प्रमाणात वापरले जातात. कंपनीने नवीन रियलमी 16 सीरीजचा तिसरा मॉडल रियलमी 16 5G नुकताच लॉन्च केला होता. 2 एप्रिल रोजी लॉन्च केलेला हा फोन आता आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने या फोनला दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि प्रीमियम फीचर्ससह लॉन्च केलाय. ज्यामुळे हा मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक मजबूत ऑप्शन ठरतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची 7,000mAh बॅटरी आहे. जी 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी दीर्घकाळ चालण्यासाठी डिझाइन केलीये. ज्यामुळे यूझर्सला वारंवार फोन चार्जिंगला लावायचं टेन्शन नाही. ज्या लोकांना दमदार बॅटरी, शानदार डिस्प्ले आणि मजबूत परफॉर्मेंसचा 5G स्मार्टफोन हवा आहे त्यांच्यासाठी रियलमी 16 5G बेस्ट ऑप्शन आहे.








