6 महिन्यातच 'शिवा'ची 'ज्योती' झाली, नवी मालिका मिळताच अभिनेत्री पूर्वा कौशिकला वाटतेय भीती, पण कसली?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'शिवा' मालिका संपल्यानंतरच सहा महिन्यातच शिवाची 'ज्योति' झाली. पण नवी मालिका मिळताच अभिनेत्रीला वेगळीच भीती वाटू लागली आहे.
advertisement
advertisement
advertisement
"आधीही मी झी मराठीवर 'शिवा' नावाची भूमिका साकारली होती, जी खूप वेगळी होती आणि सर्वसामान्य मुलींसारखी नव्हती. त्यामुळे मला भीती होती की त्या भूमिकेनंतर मला पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका मिळेल का. तसेच, पुन्हा एका साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील का, असा प्रश्न मनात होता. पण झी मराठीने माझा हा समज मोडून काढला. त्यामुळे ज्योतीच्या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो क्षण शब्दांत सांगणं कठीण आहे."
advertisement
advertisement
"ज्योती ही खूप समजूतदार, नाजूक आणि सोज्वळ मुलगी आहे. तिचं राहणीमान, वागणं आणि तिचा साधेपणा साकारण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. मला हळू बोलायचं आहे, शब्दांचा तोल राखायचं आहे आणि वागताना स्वतःला ओव्हर दाखवायचं नाही. साध्या मुलीची भूमिका करणं सोपं वाटत असलं तरी माझ्यासाठी ते आव्हानात्मक आहे."
advertisement
"मी खूप मेहनत घेत आहे आणि ती प्रेक्षकांना नक्की दिसेल. प्रोमोला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ज्योतीच्या भूमिकेबद्दल मला थोडी भीती आहे. मी कशी दिसेन आणि प्रेक्षकांना कितपत आवडेन याची. पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे की प्रेक्षक ज्योतीवरही तितकंच प्रेम करतील. प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे, याचा मला आनंद आहे", असंही पूर्वाने सांगितलं.








