Fridge Safety : उन्हाळ्यात फ्रिजमुळे होऊ शकतो स्फोट, सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमची एक छोटीशी निष्काळजी तुम्हाला हजारो रुपयांच्या नुकसानीत आणि संकटात टाकू शकते. चला तर मग, जाणून घेऊया फ्रिज सुरक्षित ठेवण्यासाठीच्या काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स.
एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि आता सूर्याने आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. घराबाहेर पडलं की अंगाची लाहीलाही होते आणि घरात आल्यावर आपण सगळ्यात आधी धाव घेतो ती म्हणजे फ्रिजकडे. थंडगार पाणी, आईस्क्रीम आणि उन्हाळ्यात खराब होऊ नये म्हणून ठेवलेलं अन्न... फ्रिज हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. घर असो, ऑफिस असो वा दुकान, सध्या फ्रिज 24 तास सुरू आहेत.
advertisement
पण, ज्या फ्रिजमुळे आपल्याला थंडावा मिळतोय, तोच फ्रिज तुमच्या एका छोट्या चुकीमुळे बॉम्ब ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळ्यात फ्रिजचा अतिवापर आणि वाढतं तापमान यामुळे अनेकदा फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट किंवा कॉम्प्रेसरचा स्फोट होण्याच्या घटना समोर येतात. तुमची एक छोटीशी निष्काळजी तुम्हाला हजारो रुपयांच्या नुकसानीत आणि संकटात टाकू शकते. चला तर मग, जाणून घेऊया फ्रिज सुरक्षित ठेवण्यासाठीच्या काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स.
advertisement
भिंतीला चिकटवून फ्रिज ठेवताय? ही सर्वात मोठी चूकइलेक्ट्रॉनिक रिपेअर एक्स्पर्ट रोहित प्रजापती यांच्या मते, बहुतेक लोक जागा वाचवण्यासाठी फ्रिज अगदी भिंतीला चिकटवून ठेवतात. ही सर्वात मोठी चूक आहे. फ्रिजच्या मागच्या बाजूला किमान 5-6 इंच जागा मोकळी असावी. उन्हाळ्यात फ्रिजचा कॉम्प्रेसर खूप गरम होतो. जर हवा खेळती राहिली नाही, तर ओव्हरहीटिंगमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते.
advertisement
व्होल्टेज चढ-उतार आणि स्टेबलायझरचा अभावजर तुमच्या भागात वारंवार लाईट जात असेल किंवा व्होल्टेज कमी-जास्त होत असेल, तर स्टेबलायझरशिवाय फ्रिज चालवणे धोक्याचे आहे. अचानक हाय व्होल्टेज आल्यास कॉम्प्रेसर जळू शकतो किंवा मोठा अपघात होऊ शकतो. तसेच, फ्रिज कमी जागेत ठेवू नका, कारण तिथे वेंटिलेशन नीट होत नाही.
advertisement
वर्षभरानंतर फ्रिज सुरू करताना हे नक्की तपासाअनेक लोक फक्त उन्हाळ्यातच फ्रिज सुरू करतात. अशा वेळी तो प्लगमध्ये लावण्यापूर्वी काही गोष्टी तपासा:उंदराने वायर तर कुरतडली नाही ना?वायर कुठे जळलेली किंवा कट झालेली दिसतेय का?प्लग आणि स्विच सुरक्षित आहेत का?या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोठे अपघात घडतात. जर वायरमधून स्पार्क होत असेल किंवा करंट लागत असेल, तर त्वरित इलेक्ट्रिशियनला बोलवा.
advertisement
उन्हाळ्यासाठी योग्य टेंपरेचर सेटिंगप्रत्येक ऋतूमध्ये फ्रिज एकाच सेटिंगवर चालवू नका. उन्हाळ्यात कुलिंग थोडे जास्त ठेवा, जेणेकरून अन्न सुरक्षित राहील. मात्र, खूप जास्त लो टेंपरेचर ठेवल्याने कॉम्प्रेसरवर अतिरिक्त ताण पडतो. विशेषतः जर तुमचा फ्रिज जुना असेल, तर अशा दबावामुळे कॉम्प्रेसर फाटण्याचा धोका असतो.
advertisement
सूर्यप्रकाश आणि सर्व्हिसिंगकडे लक्ष द्याफ्रिज अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश येणार नाही. सूर्यप्रकाशामुळे फ्रिज लवकर गरम होतो आणि कॉम्प्रेसरला जास्त काम करावे लागते. तसेच, जर फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ जमत असेल किंवा कॉम्प्रेसर सतत सुरू राहत असेल, तर समजून जा की सर्व्हिसिंगची वेळ आली आहे. तज्ज्ञांच्या मते, वर्षातून किमान 2 वेळा फ्रिजची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement







