Mumbai News: BMC निवडणूक हरल्या पण, सामान्य माणसाचं मन जिंकलं; मनीषा पवार यांच्या 'त्या' कामाचं होतंय कौतुक
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
जरीही त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये हरल्या पण त्यांनी सामान्य माणसाचं मन जिंकलं. मनीषा पवार यांनी त्यांच्या निधनाआधी अवयव दानाचा निर्णय घेतला होता. आता त्यांच्या अवयवाचे गरजूंना दान करण्यात आले आहे.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) च्या 197 वॉर्डमधील अपक्ष उमेदवार मनीषा पवार यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांनी त्यांच्या निधनाआधी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर मनीषा यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे यकृत आणि हृदय दोन्हीही गरजू व्यक्तींना दान करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मनीषा ह्या जरीही निवडणूकीत हरल्या असल्या तरीही सामान्य माणसाच्या मनात त्या जिंकल्या आहेत.
वरळीमध्ये राहणार्या मनीषा यांचे हृदय शुक्रवारी माहीम येथील एस. एल. रहेजा रुग्णालयातून मुलुंड येथील फोर्टीज रुग्णालयामध्ये ग्रीन कॉरिडॉरमधून अवघ्या 23 मिनिटांमध्ये पोहोचवण्यात आले. मनीषा यांचे हृदय बुलढाणा येथील 39 वर्षीय एका गरजू व्यक्तीला दान करण्यात आले आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके नियमितपणे होत नसल्यामुळे त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्रक्रिया करण्यात आली. ही शस्रक्रिया फार कठीण स्वरूपाची असते. ही मुंबईतली सहावी हृदय प्रत्यारोपणाची शस्रक्रिया होती.
advertisement
हृदय प्रत्यारोपणाची पाचवी शस्रक्रिया गेल्या काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. जी ठाण्याहून गिरगावला ग्रीन कॉरिडोरमधून नेण्यात आले. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे दान केलेले अवयव कोणत्याही अडथळ्याशिवाय, कुठेही थांबा न घेता इच्छित रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केलेला एक निश्चित आणि मोकळा केलेला मार्ग. रुग्णवाहिकेला मूळ ठिकाणापासून इच्छित स्थळापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसांकडून एक पायलट वाहन नेमले जाते. त्या वाहनातून गरजू व्यक्तीसाठीचे अवयव नेले जाते.
advertisement
जेव्हा हे अवयव नेले जाते, त्यावेळी त्या मार्गामध्ये असणाऱ्या सर्व वाहतूक चौक्यांना या घटनेची माहिती पूर्वीच दिली जाते. ते अवयव नेणारी रुग्णवाहिका येण्यापूर्वी सर्व वाहनं बाजूला करण्यासाठी कर्मचारी तैनात केले जातात. नियंत्रण कक्ष सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मार्गावर थेट लक्ष ठेवते. तर, मनीषा यांचे यकृत, यकृताच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या व्यक्तीला दान करण्यात आले. यकृताच्या कर्करोगामुळे त्यांचे यकृत निकामी होण्याकडेच चालले होते. अशा 62 वर्षीय गरजू व्यक्तीला यकृत दान करण्यात आले आहे.
advertisement
मनीषा पवार यांचे अवयव गरजू व्यक्तींना दान केल्यानंतर त्यांच्या पतीने 'टाइम्स ऑफ इंडिया'सोबत संवाद साधला. यावेळी, प्रकाश पवार उर्फ 'पप्पू' म्हणाले की, "काही महिन्यांपूर्वी मनीषाने अचानक अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंबंधित रुग्णालयाने आम्हाला अधिकाधिक माहिती दिली. मला आणि माझ्या पत्नीला राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 3:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: BMC निवडणूक हरल्या पण, सामान्य माणसाचं मन जिंकलं; मनीषा पवार यांच्या 'त्या' कामाचं होतंय कौतुक







