Recipe : गरमीमध्ये पोटासाठी सुपरफूड ठरेल 'हा' रायता; थंडावा आणि पचन दोन्ही फायदे शरीराला
- Published by:Devika Shinde
Last Updated:
रायता केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर तो या कडक उन्हात तुमच्या पोटासाठी एखाद्या अमृतासारखं काम करतो. चला तर मग, जाणून घेऊया उन्हाळ्यासाठी खास हेल्दी रायता रेसिपी आणि त्याचे आरोग्यदायी फायदे.
एप्रिल-मे महिना सुरू झाला की सूर्याचा कडाका अंगाची लाहीलाही करू लागतो. या दिवसांत बाहेरून घरी आल्यावर भूक तर लागते, पण जेवण नकोसं वाटतं. कधी पोटात जळजळ होते, तर कधी गॅस आणि अपचनाचा त्रास डोकं वर काढतो. "उन्हाळ्यात नक्की काय खावं?" हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो. आपण कितीही थंड सरबतं प्यायलो, तरी दुपारच्या जेवणात जोपर्यंत काहीतरी थंडावा देणारं नसतं, तोपर्यंत तृप्त वाटत नाही.
advertisement
advertisement
1. उन्हाळ्यात रायता का आवश्यक आहे?उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे तापमान वाढते आणि पाण्याची कमतरता भासू लागते. दही, काकडी आणि पुदीना यांपासून बनवलेला रायता शरीराला आतून थंडावा देतो. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरिया पोटाचे आरोग्य सुधारतात आणि अन्नाचे पचन लवकर होण्यास मदत करतात. काकडीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते, तर पुदीना तुम्हाला ताजेतवाने ठेवतो.
advertisement
advertisement
बनवण्याची पद्धत: 1. एका बाऊलमध्ये ताजे दही घ्या आणि ते व्यवस्थित फेटून स्मूद करून घ्या. 2. त्यात किसलेली काकडी घाला. (काकडीतील अतिरिक्त पाणी पिळून घेतल्यास रायता जास्त पातळ होत नाही). 3. आता यात बारीक चिरलेला पुदीना, जिरे पूड, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. 4. हा रायता 15-20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार रायता खाण्याची मजा काही वेगळीच असते.
advertisement
3. रायता खाण्याचे 5 मोठे फायदेपोटाला थंडावा: पित्त, जळजळ आणि ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो.हायड्रेशन: काकडी आणि दह्यातील पाण्याचे प्रमाण शरीराला हायड्रेट ठेवते.वजन नियंत्रण: हा रायता लो-कॅलरी असल्याने वजन कमी करण्यास मदत करतो.पचनशक्ती वाढते: दह्यातील गुणधर्मांमुळे गॅस आणि अपचनाच्या समस्या दूर होतात.थकवा कमी होतो: उन्हामुळे येणारा सुस्तीपणा घालवून हा पदार्थ तुम्हाला ऊर्जा देतो.
advertisement
advertisement









