इंडक्शन कूकटॉपचे असतात 3 प्रकार! चुकीचं खरेदी केल्यास पैसे जातील वाया, पाहा कोणता बेस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम म्हणून देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होतोय अशी भीती लोकांमध्ये आहेत. यामुळेच आता इंडक्शन कूकटॉपची मागणी वाढली आहे.
Induction Cooktop Types: जगात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याची भीती सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. याच कारणामुळे आता भारत देशात किचनमध्ये इंडक्शन कूकटॉपची मागणी वेगाने वाढतेय. मात्र योग्य ऑप्शन निवडणं सोपं नाही. बाजारात वेगवेगळ्या टाइपचे इंडक्शन उपलब्द आहेत. यामध्ये पोर्टेबल इंडक्शन, बिल्ट इन इंडक्शन आणि फ्रीस्टँडिंग इंडक्शनचा समावेश आहे. याची खासियत आणि वापर वेगळा असतो. कोणत्याही माहितीशिवाय खरेदी केला तर पैसा आणि काम दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच खरेदीपूर्वी कोणता इंडक्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल हे जाणून घ्यायला हवं. योग्य निवड केल्यास तुमचा कुकिंग एक्सपीरियन्स हा चांगला होतो.
advertisement
पोर्टेबल इंडक्शन म्हणजे काय? : पोर्टेबल इंडक्शन हा सर्वात कॉमन आणि परवडणारा असतो. जो सहज कुठेही ठेवला जातो आणि वापरलाही जाऊ शकतो. यात सामान्यतः एकच बर्नर असतं. जे लहान कुटुंब आणि सिंगल वापरासाठी बेस्ट मानलं जातं. हे वापरण्यासाठी कोणत्याही खास इंस्टॉलेशनची गरज नसते. फक्त ब्लग लावून चालू केला जाऊ शकतो. खरंतर याची पॉवर आणि क्षमता मर्यादित असते. यामुळेच जास्त अन्न शिजवणे किंवा सतत वापरासाठी हा उपयुक्त राहत नाही. तरीही बजेट आणि सुविधेच्या हिशोबाने हा चांगला ऑप्शन मानला जातो.
advertisement
बिल्ट इन इंडक्शन : बिल्ट इन इंडक्शन मॉड्यूलर किचनसाठी डिझाइन केला जातो आणि याला काउंटरटॉपमध्ये फिट केलं जातं. यात एकापेक्षा जास्त बर्नर मिळतात. ज्यामधून एकाच वेळी अनेक गोष्टी शिजवल्या जाऊ शकतात. याची डिझाइन प्रीमियम आणि स्वच्छ दिसते. जी किचनची सुंदरता वाढवते. खरंतर हे इंस्टॉल करण्यासाठी पहिलेच प्लॅनिंग करावी लागते. या इंडक्शनची किंमत पोर्टेबल इंडक्शनपेक्षा खुप जास्त असतं. जे नेहमीच जास्त कुकिंग करतात त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
फ्रीस्टँडिंग इंडक्शनचा वापर : फ्रीस्टँडिंग इंडक्शन एक प्रकारचा अडव्हान्स ऑप्शन असतो. ज्यात इंडक्शनसह ओव्हन किंवा इतर कुकिंग फीचर्सही उपलब्ध असतात. याचा वापर सामान्यतः मोठे किचन आणि कमर्शियल वापरासाठी बेस्ट असतो. यात मल्टी बर्नर सेटअप मिळतो. ज्यामुळे एकाचवेळी अनेक डिश तयार केल्या जाऊ शकतात. हे खुपच पॉवरफूल असते. मात्र याची किंमत आणि साइज दोन्हीही जास्त असते. यामुळे तेर प्रत्येक घरासाठी गरजेचे नसते. तर ज्यांना खुपच गरज आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते.
advertisement
तुमच्यासाठी कोणतं इंडक्शन योग्य : इंडक्शन खरेदी करताना तुमच्या गरजा पाहूनच खरेदी करा. बजेट आणि किचन स्पेस लक्षात ठेवायला हवी. तुम्ही कमी वापर करत असाल किंवा कुटुंब लहान असेल तर पोर्टेबल इंडक्शन योग्य राहतो. तसंच मॉड्यूलर किचन असेल आणि रोज जास्त कुकिंग इंडक्शनचा वापर करत असाल तर बिल्ट इन इंडक्शन बेस्ट ऑप्शन शकतो. चुकीची निवड केल्याने पैसे वाया जातात, यासोबतच तुम्हाला अडचणीही येतील. यामुळे विचार करूनच योग्य इंडक्शन निवडण योग्य ठरतं.








