Summer Care : उन्हाळ्यातही वाटेल गार, नैसर्गिक गारवा देण्यासाठी उपयुक्त - पुदिना, जाणून घेऊया पुदिन्याचे फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पुदिन्यात असलेलं मेन्थॉल शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतं. उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी, कोशिंबीर, पुदिन्याचा रस यामुळे उष्णतेचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुदिना हा सर्वात सोपा मार्ग आहे.
मुंबई : उन्हाळा वाढतोय आणि सोबतच उन्हाळ्यात होणारे त्रासही. कडक उन्हात थंडावा देण्यासाठी पुदिन्याची पानं हा उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे.
पुदिन्याची लहान, हिरवी, सुगंधी पानं शरीर आणि मनालाही थंडावा देतात. पुदिन्यामुळे अनेक आजार ही टाळता येतात. पुदिन्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे, कडक उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी पुदिना हा एक उत्तम आणि सोपा नैसर्गिक उपाय आहे.
पुदिन्यात असलेलं मेन्थॉल शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतं. उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी, कोशिंबीर, पुदिन्याचा रस यामुळे उष्णतेचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुदिना हा सर्वात सोपा मार्ग आहे.
advertisement
Health Tips : बसून काम केल्यानं पाठीचे वाजले बारा ? या आसनानं मिळेल उतारा, जाणून घ्या कसं करायचं आसन
आयुर्वेदात पुदिन्याला विशेष स्थान आहे. तज्ज्ञही दही रायता, पुदिन्याची चटणी, लिंबू-पुदिन्याचं पाणी किंवा सॅलडच्या स्वरूपात रोजच्या आहारात त्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
पचन - पुदिन्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. त्यामुळे अपचन, गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो, पोट हलकं राहतं आणि भूक वाढण्यासही मदत होते.
advertisement
निर्जलीकरण - डिहायड्रेशन टाळण्यासाठीही पुदिना प्रभावी आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यानं डिहायड्रेशन होऊ शकतं. पुदिन्याचं पाणी प्यायल्यानं शरीरातील पाण्याची कमतरता टाळणं शक्य होतं आणि दिवसभर फ्रेश वाटतं.
डोकेदुखी - डोकेदुखी आणि तणावापासून आराम मिळतो. डोकेदुखी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी पुदिन्याचा चहा खूप फायदेशीर आहे.
ऊर्जा - सकाळी रिकाम्या पोटी पुदिन्याचं पाणी प्यायल्यानं दिवसभर ऊर्जा आणि ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.
advertisement
रोगप्रतिकारशक्ती - पुदिन्यामधे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि हंगामी आजारांना आळा घालणं शक्य होतं.
घामाचा दुर्गंध -पुदिन्यामुळे घामाचा दुर्गंध कमी होतो किंवा नाहीसा होतो.
लठ्ठपणा - पुदिन्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
advertisement
दाह - पुदिन्यात दाहशामक आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत. यामुळे शरीरातील दाह देखील कमी होऊ शकतो.
हृदय - हृदय रुग्णांसाठीही पुदिना खाणं फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेदात, उन्हाळ्यासाठी पुदिना विशेषतः फायदेशीर मानला जातो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननं केलेल्या अभ्यासात पुदिन्याचे अनेक आरोग्यदायी फायदे दिसून आले आहेत, ज्यात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मही असल्याचं दिसून आलं आहे.
advertisement
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि पचन सुलभ करण्यासाठी पुदिना हा उत्तम पर्याय आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 5:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : उन्हाळ्यातही वाटेल गार, नैसर्गिक गारवा देण्यासाठी उपयुक्त - पुदिना, जाणून घेऊया पुदिन्याचे फायदे









