advertisement

Business Ideas : महिलांसाठी 5 बेस्ट कमी खर्चातले बिझनेस, घरातूनच करा सुरुवात, कमाईचा बेस्ट ऑप्शन Video

Last Updated:

आता महिलांसाठी घरबसल्या व्यवसाय सुरू करून कमाई करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कमी भांडवलात सुरू होणारे हे व्यवसाय घरातूनच करता येतात.

+
News18

News18

पुणे : अनेक महिलांना घरच्या जबाबदाऱ्या आणि मुलांच्या संगोपनामुळे नोकरी करणे शक्य होत नाही. काही महिलांना तर मुलांसाठी आपली नोकरीसुद्धा थांबवावी लागते. त्यामुळे आर्थिक स्वावलंबनाचं स्वप्न अनेकदा अपूर्ण राहातं. मात्र आता महिलांसाठी घरबसल्या व्यवसाय सुरू करून कमाई करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कमी भांडवलात सुरू होणारे हे व्यवसाय घरातूनच करता येतात. महिलांसाठी कोणते व्यवसाय घरबसल्या करता येतील, त्यासाठी लागणारी मशिनरी कुठे मिळेल? किती खर्च येईल? यासगळ्याविषयी माहिती राकेश गवांडे यांनी लोकल 18 ला सांगितले आहे.
ऑटोमॅटिक गिरणी व्यवसाय
राकेश गवंडे यांनी महिलांसाठी घरबसल्या सुरू करता येणारे पाच व्यवसाय सांगितले आहेत, जे चांगलं उत्पन्न देऊ शकतात. यातील पहिला व्यवसाय म्हणजे ऑटोमॅटिक गिरणी. या गिरणीत तुम्ही ज्वारी, डाळी आणि इतर धान्य पिठात रूपांतरित करून विकू शकता आणि त्यामुळे चांगली कमाई करू शकता. ही मशीन साधारणतः 25 हजारांपासून उपलब्ध आहे आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडू शकता.
advertisement
ऑटोमॅटिक चटणी/मसाला मशीन
दुसरा व्यवसाय म्हणजे चटणी किंवा मसाले बनवण्याची ऑटोमॅटिक मशीन. ही मशीन वापरायला अगदी सोपी आहे आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य आहे. ही मशीन 55 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे, तुमच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडता येते. या मशीनच्या साह्याने तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
चिप्स, फळांची पावडर आणि लाडू बनवण्याची मशीन
सध्या उन्हाळ्याच्या काळात घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी आहे. ऑटोमॅटिक चिप्स मशीन वापरून बटाटे टाकल्यावर काही सेकंदात चिप्स तयार करता येतात. तसेच फळांची पावडर तयार करण्यासाठी आणि डिंकाचे लाडू किंवा इतर घरगुती पदार्थ बनवण्यासाठीही मशीन उपलब्ध आहेत. ही मशीन साधारण 25 हजारांपासून सुरू होतात आणि त्यांचा उपयोग करून महिलांनी घरबसल्या व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
advertisement
चपाती आणि भाकरी बनवण्याची ऑटोमॅटिक मशीन
चपाती आणि भाकरी बनवण्याचा व्यवसाय अनेक महिलांसाठी फायदेशीर ठरतो. घरगुती मेस चालवणाऱ्या महिलांशिवाय, तुम्ही घरातूनही हा व्यवसाय सुरू करू शकता. हॉटेल्स किंवा ज्यांना रोज चपाती-भाकरीची गरज आहे, त्यांना ऑटोमॅटिक मशीनच्या साह्याने तयार चपात्या आणि भाकरी पुरवता येतात. ही मशीन 50 हजारांपासून सुरू होते आणि तुमच्या गरजेनुसार योग्य मॉडेल उपलब्ध आहे. या सर्व मशीन्स उत्तम इंडस्ट्रीमध्ये चिंचवड या ठिकाणी उपलब्ध आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Business Ideas : महिलांसाठी 5 बेस्ट कमी खर्चातले बिझनेस, घरातूनच करा सुरुवात, कमाईचा बेस्ट ऑप्शन Video
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement