Summer Care : कडक उन्हाळ्यात प्या गारेगार स्मूदी, शहाळ्याच्या मलईनं वाटेल फ्रेश, शरीर राहिल थंड
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. अशा वेळी हलकी, नैसर्गिक पेयं विशेष फायदेशीर ठरतात. यासाठी एक थंडगार रेसिपी. ग्रीन कोकोनट क्रीम स्मूदी हा एक उत्तम पर्याय आहे. या स्मूदीनं शरीराला त्वरित थंडावा मिळतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.
मुंबई : उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं. त्यासाठी शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणं, पुरेसं पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्याबरोबरच शहाळ्याचं पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत तर उन्हाळ्यातले आवडते पर्याय आहेतच. याच शहाळ्यातली मलई वापरुन केलेली स्मूदी या उन्हाळ्यात नक्की करुन बघा.
तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ शकतात, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. अशा वेळी हलकी, नैसर्गिक पेयं विशेष फायदेशीर ठरतात. यासाठी एक थंडगार रेसिपी. ग्रीन कोकोनट क्रीम स्मूदी हा एक उत्तम पर्याय आहे. या स्मूदीनं शरीराला त्वरित थंडावा मिळतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.
advertisement
नारळाच्या पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. नारळाच्या मलईमधे आरोग्यदायी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ऊर्जा मिळते. ही स्मूदी उन्हाळ्याच्या उष्णतेत डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करू शकते.
शहाळ्याच्या मलईची स्मूदी बनवण्यासाठी, एक कप शहाळ्याचं पाणी, अर्धा कप नारळाची मलई, एक लहान केळ, एक चमचा मध, तीन ते चार बर्फाचे तुकडे असं साहित्य घ्या. सर्वप्रथम, नारळाचं पाणी आणि मलई काढून घ्या. त्यानंतर, केळ्याचे लहान तुकडे करा. ब्लेंडरमधे नारळाचं पाणी, नारळाची मलई आणि केळं घाला. नंतर त्यात मध आणि बर्फाचे तुकडे घाला.
advertisement
Health Tips : बसून काम केल्यानं पाठीचे वाजले बारा ? या आसनानं मिळेल उतारा, जाणून घ्या कसं करायचं आसन
स्मूदी गुळगुळीत आणि मलईदार होईपर्यंत व्यवस्थित ब्लेंड करा. पातळ स्मूदी आवडत असेल तर त्यात, थोडं अधिक नारळाचं पाणी घालू शकता. स्मूदी एका ग्लासमधे ओता आणि थंडगार सर्व्ह करा.
उन्हात फिरल्यानंतर किंवा दुपारी ही स्मूदी पिणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराला त्वरित थंडावा मिळतो आणि फ्रेश वाटतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर नारळाची मलई खूप खाऊ नका, कारण त्यात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 6:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : कडक उन्हाळ्यात प्या गारेगार स्मूदी, शहाळ्याच्या मलईनं वाटेल फ्रेश, शरीर राहिल थंड