IIT Baba : संन्यासातून थेट संसारात.... महाकुंभातील IIT बाबानं केलं लग्न, कोण आहे बायको? सोशल मीडियावर रंगली चर्चा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या या बाबांनी आता संसाराची नवी इनिंग सुरू केली आहे त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरत आहे.
मुंबई : आपल्या आयुष्यात कधी कोणतं वळण येईल, हे सांगता येत नाही. कधी एखादी व्यक्ती उच्चशिक्षण घेऊन कॉर्पोरेट जगात आपलं नाव कमावते, तर कधी अचानक अध्यात्माच्या वाटेवर चालू लागते. गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीची प्रचंड चर्चा झाली. भगवी वस्त्रं, लांब दाढी आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेल्या या तरुणाने महाकुंभ मेळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चर्चा फक्त त्याच्या वेशाची नव्हती, तर त्याच्या शिक्षणाची होती. "मी आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केलंय," असं सांगणाऱ्या या तरुणाची ओळख सोशल मीडियावर 'आयआयटी वाले बाबा' (IIT Wale Baba) म्हणून झाली. अनेक प्रसंगी तो ट्रोल देखील झाला.
पण, आता या 'आयआयटी बाबां' पुन्हा एकदा चर्चेच आला तो म्हणजे त्याच्या लग्नामुळे. त्याच्या आयुष्यात एक नवीन आणि अनपेक्षित वळण आलं आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या या बाबांनी आता संसाराची नवी इनिंग सुरू केली आहे त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरत आहे.
मूळचे हरियाणाचे राहणारे अभय सिंह म्हणजेच लाडके 'आयआयटी वाले बाबा' आता विवाहबंधनात अडकले आहेत. सोमवारी जेव्हा ते हरियाणातील झज्जर येथे आपल्या वडिलांच्या चेंबरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतीका देखील होती. अभय सिंह यांनी कर्नाटकच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीशी लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
advertisement
कसं आणि कधी झालं लग्न?
त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील 'अघंजर महादेव' मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी त्यांनी रीतसर कोर्ट मॅरेज देखील केले. अभय आणि प्रतीका यांची भेट सुमारे 1 वर्षापूर्वी झाली होती. प्रतीका या मूळच्या बेंगळुरूच्या असून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
advertisement

IIT बाबा आणि त्यांची बायको
सोर्स : सोशल मीडिया
सनातन धर्मासाठी बनवणार युनिव्हर्सिटी
लग्नानंतर आता हे जोडपं एका विशेष मिशनवर काम करणार आहे. प्रतीका यांनी सांगितले की, "अभय हे अतिशय साधे, प्रामाणिक आणि सच्चे व्यक्ती आहेत. आता आम्ही दोघे मिळून सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करणार आहोत." अभय सिंह सध्या 'श्री युनिव्हर्सिटी' स्थापन करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. या विद्यापीठात केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर आध्यात्मिक साधना आणि प्राचीन भारतीय ज्ञानावरही लक्ष केंद्रित केले जाईल.
advertisement
अभय सिंह यांचे वडील कर्ण सिंह हे झज्जरमध्ये नामांकित वकील आहेत, ते बार असोसिएशनचे अध्यक्षही राहिले आहेत. आपल्या पत्नीसोबत वडिलांच्या चेंबरमध्ये पोहोचलेल्या अभय यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "मी अभ्यासाच्या दिवसात इथे येऊन केस कशा तयार होतात, हे पाहायचो," असं त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झज्जरमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 5:46 PM IST
मराठी बातम्या/देश/
IIT Baba : संन्यासातून थेट संसारात.... महाकुंभातील IIT बाबानं केलं लग्न, कोण आहे बायको? सोशल मीडियावर रंगली चर्चा








