advertisement

IPL 2026 : लिलावात 2 कोटी घेतले, आता नॉट रिचेबल झाला... इंटरनॅशनल स्टारने पंतला धोका दिला!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये दुखापत तसंच बोर्डाकडून एनओसी मिळत नसल्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटू अजून पोहोचलेले नाहीत. खेळाडू गैरहजर असल्यामुळे बऱ्याच टीमचं संतुलनही बिघडलं आहे.

IPL लिलावात 2 कोटी घेतले, आता नॉट रिचेबल झाला... इंटरनॅशनल स्टारने पंतला धोका दिला!
IPL लिलावात 2 कोटी घेतले, आता नॉट रिचेबल झाला... इंटरनॅशनल स्टारने पंतला धोका दिला!
लखनऊ : आयपीएल 2026 मध्ये दुखापत तसंच बोर्डाकडून एनओसी मिळत नसल्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटू अजून पोहोचलेले नाहीत. खेळाडू गैरहजर असल्यामुळे बऱ्याच टीमचं संतुलनही बिघडलं आहे, त्यामुळे या टीम दिग्गज खेळाडू कधी येणार? याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे लखनऊ सुपरजाएंट्सना मात्र मोठा धक्का बसला आहे. आयपीएल लिलावात 2 कोटींना विकत घेतलेला खेळाडू नेमका कुठे आहे? हेच लखनऊला माहिती नाहीये.
क्रिकबझच्या वृत्तानुसार श्रीलंकेचा 28 वर्षांचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगा याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला फिटनेस टेस्टच दिलेली नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला एनओसी दिल्यानंतरच तो आयपीएलमध्ये खेळू शकतो. वानिंदू हसरंगाने मागच्या आठवड्यात कोलंबोमध्ये बॅटिंग प्रॅक्टिसही केली होती, पण तो बॉलिंगपासून लांब राहिला, असं सांगण्यात येत आहे. कोलंबोमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर वानिंदू हसरंगा कुठे आहे? याबाबत कुणालाही माहिती नाही. लखनऊकडेही वानिंदू हसरंगाबद्दल कोणतीही अपडेट नाही.
advertisement
वानिंदू हसरंगा आयपीएल 2026 मध्ये खेळेल का नाही? याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे, त्यामुळे लखनऊ सुपरजाएंट्स हसरंगाचा पर्याय शोधू शकते. आयपीएलच्या मागच्या मोसमात हसरंगा राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये होता.

वानिंदू हसरंगाला दुखापत

वानिंदू हसरंगाला टी-20 वर्ल्ड कप 2026 वेळी दुखापत झाली होती. 7 फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हसरंगाला डाव्या हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास व्हायला सुरूवात झाली, यानंतर तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. क्रिकबझच्या वृत्तानुसार हसरंगा आयपीएल 2026 मध्ये येणार का नाही? याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे हसरंगाच्या रिप्लेसमेंटबद्दल टीम निर्णय घेऊ शकते.
advertisement
आयपीएल लिलावामध्ये बेस प्राईजमध्येच विकला गेल्यामुळे हसरंगाला खेळण्यात रस नसल्याचंही सांगितलं जात आहे. हसरंगाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 37 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्याने 81 रन केले असून 46 विकेटही घेतल्या आहेत. हसरंगा सगळ्यात आधी 2021 मध्ये आरसीबीच्या टीममध्ये होता. 2023 पर्यंत हसरंगा आरसीबीसोबत राहिला. हसरंगा आयपीएलमधून बाहेर झाला तर लखनऊकडे मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी, लियाम डॉसन आणि रेहान अहमद हे स्पिनर पर्याय आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : लिलावात 2 कोटी घेतले, आता नॉट रिचेबल झाला... इंटरनॅशनल स्टारने पंतला धोका दिला!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement